Headlines

आरोग्यमंत्र्यांच्या ‘संवाद यात्रे’पूर्वी यंत्रणा झाली सतर्क:जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयाची अचानक करण्यात आली तपासणी‎



राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या आगामी आरोग्य संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी बुधवारी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यांनी रु

.

अकोला येथील शासकीय रुग्णालयात नुकतीच एक खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेत एका गरीब महिलेला आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन संपूर्ण रुग्णालयात फिरावे लागले होते. या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने दखल घेतली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यात जिल्ह्यात कुठेही त्रुटी राहू नये. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता तालुका पातळीवरील रुग्णालयांची तपासणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, मूर्तिजापूरचे हे उपजिल्हा रुग्णालय ऐतिहासिक वारसा असलेले आहे. या दौऱ्यात डॉ. कुलवाल यांच्यासोबत डॉ. रोकडे, डॉ. कोगदे, डॉ. विशाल येदवर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे, डॉ. विद्या भरणे, डॉ. जुनेद, डॉ. रेहान चाऊस, डॉ. दीपाली वडतकर, डॉ. कारोडे, डॉ. प्रधान, डॉ. चारथळ आदी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. तपासणीदरम्यान डॉ. आरती कुलवाल यांनी रुग्णालयातील वॉर्ड, औषध साठा, आपत्कालीन विभाग आणि स्वच्छता गृहांची पाहणी केली. “शासकीय रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मायेची आणि आपुलकीची वागणूक मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी सौजन्याने वागले पाहिजे, अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गरज भासल्यास कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

रुग्णसेवेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : डॉ. आरती कुलवाल यांचा इशारा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *