Headlines

ब्लिंकरने ड्युटीवर दृश्यमानतेत वाढ:पोलिस ठाण्यांसह वाहतूक शाखेला सोलर व शोल्डर ब्लिंकर लाइट्स‎




“मॉडर्न, व्हिजिबल, टेक सॅव्ही आणि स्मार्ट पोलिसिंग’ संकल्पनेनुसार अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या व पोलिस अंमलदारांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व २३ पोलिस स्टेशन व वाहतूक शाखेला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित २५० शोल्डर ब्लिंकर लाइट्स व १०० सोलर रिफ्लेक्टर ब्लिंकर लाइट्सचे वाटप करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक कार्यालयात या आधुनिक उपकरणांचे वाटप करण्यात आले. रस्ते सुरक्षा व कर्तव्य बजावताना पोलिसांची दृश्यमानता वाढवण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या वाटपामध्ये प्रत्येक पोलिस स्टेशनला दोन बीट मार्शल अंमलदारांसाठी चार शोल्डर ब्लिंकर आणि नाकाबंदीदरम्यान वापरण्यासाठी चार सोलर रिफ्लेक्टर ब्लिंकर देण्यात आले आहेत. तसेच, वाहतूक शाखेतील सर्व अंमलदारांना प्रत्येकी दोन शोल्डर ब्लिंकर देण्यात आले आहेत. याप्रसंगी पोलिस अधीक्षकांनी सर्व उपस्थित अधिकारी व अंमलदारांना या उपकरणांचा योग्य वापर करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक कार्यक्षमतेने सेवा देण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमास अपर पोलिस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक आणि शहर विभागातील सर्व ठाणे प्रभारी उपस्थित होते. अशी वाढेल नागरिक, पोलिसांची सुरक्षा शोल्डर ब्लिंकर हे दिवे सौरऊर्जेवर चालणारे चेतावणी दिवे असून ते आपोआप रात्री सुरू व दिवसा बंद होतात. बाह्य वीज जोडणीची आवश्यकता नसल्याने खर्चात बचत होते. रात्रीच्या वेळी, पाऊस व धुक्यामुळे दृश्यमानता कमी असताना वाहनचालकांना दुरूनच धोक्याची किंवा सुरक्षेची सूचना मिळते. रस्त्यावरील सुरक्षितता राखण्यासाठी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी या उपकरणांचा नाकाबंदीदरम्यान प्रभावीपणे वापर होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *