Headlines

कौंडण्यपूर धाममध्ये एक लाखांपेक्षा जास्त भाविकांना महाप्रसाद वितरण:वृंदावन श्री धाम कौंडिण्यपूर येथे इस्कॉनचा संकल्प पूर्ण




विदर्भाचे वृंदावन म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री धाम कौंडण्यपूर येथे अधिक मासानिमित्त श्री श्री रुक्मिणी द्वारकानाथ मंदिर, इस्कॉन कौंडण्यपूर यांच्या वतीने एक लाखाहून अधिक भक्तांना महाप्रसाद वितरण करण्याचा संकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. इस्कॉनचे संस्थापक आचार्य परमपूज्य ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे वरिष्ठ शिष्य, इस्कॉन पदयात्रा मंत्री, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जीवनगौरव सन्मानाने गौरविण्यात आलेले विश्वविख्यात कीर्तनसम्राट तथा त्रिदंडी संन्यासी परमपूज्य श्रील लोकनाथ स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने हा भव्य आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात आला. १७ मे ते १५ जून या कालावधीत श्री धाम कौंडण्यपूर येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी अखंड महाप्रसाद वितरण सेवा सुरू होती. या कालावधीत विविध शहरांतील व गावांतील भक्त-यजमानांनी उदार भावनेने सेवा अर्पण केली. त्यांच्या सहकार्यामुळे हजारो भाविकांना दररोज महाप्रसादाचा लाभ मिळाला. अखेर एक लाखाहून अधिक भक्तांना महाप्रसाद वितरणाचा संकल्प पूर्णत्वास गेला. या महाप्रसाद सेवेचे यजमान म्हणून अमरावती येथून रमेश अलधवले, माणिक लोखंडे, राजेंद्र सारडा, गोपीचंद भामोरा, विश्वंभर झाकर्डे, स्व. पवित्रवाणी प्रभू, रमेश जगताप, मारुतराव भुसारी, राजेंद्र तंबूसकर, चंपकलता माताजी, मनोज गुडबडे, कृष्णेश नारायण यादव, आर्वी येथून जयकिशन लायचा, वैभव फटींग, सुरेश अग्रवाल, चेतन अग्रवाल, वर्धा येथून ओमप्रकाश सराफ, कैलाशलाल, नागपूर येथून ॲड. आनंद परचुरे, सुनील काशीकार, प्रीती श्रीकर वलुंजकर, ब्रह्मस्मरण प्रभूजी, परतवाडा येथून निलेश धुड, पाचोरा येथून सुरेश मोरे, राळेगाव येथून पारस वर्मा, यवतमाळ येथून अजय शर्मा, मूर्तिजापूर येथून सरिता मुकेश गोमाशे इत्यादी अनेक भक्तांनी विविध दिवशी सेवा अर्पण केली. त्यांच्या वतीने भक्तांना प्रेमपूर्वक महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दररोज पहाटे ४.३० वाजता श्री श्री रुक्मिणी द्वारकानाथ व श्री गोवर्धन (गिरिराज) भगवान यांच्या मंगल आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होत असे. सकाळी ११ वाजता भव्य महाआरतीनंतर अधिक मासानिमित्त श्री धाम कौंडण्यपूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येत होते. या आध्यात्मिक उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दररोज हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण धाम भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. भाविकांच्या उपस्थितीने परिसरात भक्ती, श्रद्धेचे वातावरण अधिक मासाच्या या पवित्र काळात हजारो भाविकांनी श्री धाम कौंडण्यपूर येथे पवित्र स्नान, नामजप, तपश्चर्या, भगवानांचे दर्शन, गंगा आरती व महाप्रसादाचा लाभ घेत आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव घेतला. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचे अद्भुत वातावरण निर्माण झाले होते. या यशस्वी उपक्रमामुळे श्री धाम कौंडण्यपूर हे अधिक मासातील प्रमुख आध्यात्मिक केंद्र म्हणून पुन्हा एकदा भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *