अमरावती येथील रुग्णालयातील आग आणि बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. रुग्णालयांमध्ये आग लागून निष्पाप बालकांचे बळी जाणे ही अत्यंत दुर्द
.
3 वर्षांत 44 हजार बालकांचे मृत्यू
रोहित पवार यांनी राज्यातील बालमृत्यूच्या भीषण आकडेवारीकडे लक्ष वेधले. गेल्या 3 वर्षांत महाराष्ट्रात 5 वर्षांखालील तब्बल 40 ते 44 हजार बालकांचा कुपोषण, विषबाधा, सर्पदंश आणि उपचारांअभावी मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू गरीब कुटुंबांतील मुलांचे असून अंगणवाड्यांमध्ये जनावरांनाही न शोभेल असे निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
रुग्णालयांचे तत्काळ ऑडिट आणि कंत्राटदारांवर कारवाई
आधी भंडारा आणि आता अमरावतीत घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी सरकारने पुढच्या 6 महिन्यांत सर्व रुग्णालयांचे ऑडिट पूर्ण करून त्रुटी दूर कराव्यात. एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित करून प्रकरण दाबण्यापेक्षा निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर थेट गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
देवेंद्र फडणवीस यांच्या युवा संवादावर टीका
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला युवा संवाद हा ‘लोकांचा नसून आणलेल्या गर्दीचा’ कार्यक्रम होता, असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी यांच्या संवाद कार्यक्रमाची ही नक्कल असून तिथे पूर्वतयारी केलेले ठरवून प्रश्न विचारले गेले. नागपूरमध्ये गेल्या 3 महिन्यांत 32 खून झाले आहेत, त्यावर गृहमंत्र्यांना थेट प्रश्न का विचारू दिले नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
मतदार याद्यांमधून लाखो नावे वगळल्याचा आरोप
महाराष्ट्रात सुमारे 2 कोटी 6 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असल्याचा दावा करत पवार म्हणाले की, विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बीएलओ (BLO) वर दबाव आणून हा टेबल सर्व्हे करण्यात आला आहे. 30 तारखेला अंतिम यादी आल्यावर यातील त्रुटी उघड केल्या जातील.
साखरेची दरवाढ व सट्टेबाजी
साखर कारखान्यांकडे पुरेसा साठा असतानाही बाजारात साखरेचे दर वाढवले जात आहेत. ग्राहकांची लूट करणाऱ्या अशा साठेबाज आणि सट्टेबाजांवर सरकारने कडक कारवाई करावी, असे ते म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा फेटाळली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, शरद पवार यांनी 65 वर्षे जपलेल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवरच पक्ष पुढे चालेल. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा किंवा विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मोठ्या आंदोलनाचा इशारा
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा रोहित पवार यांनी दिला. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक योजनांमधील वयोमर्यादा, वसतिगृहांची सुविधा, अन्नाची गुणवत्ता, भरती प्रक्रिया आणि पेसा कायद्याशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांमध्ये 30 वर्षांची वयोमर्यादा ठेवण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला. आदिवासी भागात अनेक युवक उशिरा शिक्षण पूर्ण करतात, त्यामुळे त्यांना संधी मिळण्यासाठी वयोमर्यादेत बदल करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. “आदिवासी समाजासाठी अर्थसंकल्पात निधी राखून ठेवला जातो. तो निधी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या हक्काच्या सुविधांसाठी वापरला गेला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने आजच्या बैठकीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही, तर पुढील महिन्यात किंवा त्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सहभागातून मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. त्यांनी या आंदोलनासाठी राहुल गांधी यांना निमंत्रित करण्याची शक्यता व्यक्त केली.
हेही वाचा…
अमरावतीमध्ये रुग्णालयाच्या बाल युनिटमध्ये आग: 3 नवजात बालकांचा मृत्यू, 39 बालके दाखल होती; व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने दुर्घटना

अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. येथे वाचा संपूर्ण बातमी