Headlines

Padmasinh Patil Acquitted; Jitendra Awhad Reacts to Nimbalkar Case


पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या ऐतिहासिक निकालानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असतानाच, राष्ट्रवादी काँग्

.

पहिला निकाल महत्त्वाचा असतो न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मला सुरुवातीपासूनच शंभर टक्के खात्री होती की डॉक्टर साहेबांनी हा खून केला नव्हता. आज कोर्टाचा निकाल लागला, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कोणत्याही कायदेशीर लढाईत जो पहिला निकाल असतो, तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. स्वीकृत दर्शनी पहिल्या निकालात काय आलं? तर डॉ. पद्मसिंग पाटील निर्दोष मुक्त झाले आहेत, हेच सर्वात महत्त्वाचे आहे.” डॉ. पाटील यांच्या सुटकेमुळे निंबाळकर-पाटील कुटुंबातील या दोन दशकांच्या वादाला तूर्तास एक वेगळे वळण मिळाले आहे.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण डॉ. पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते असून ते शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि नातेवाईकही आहेत. त्यामुळे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर जेव्हा पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप झाले, तेव्हा संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. आज सीबीआय कोर्टाने त्यांना सर्व आरोपांतून मुक्त केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने दिलेली ही ‘क्लीन चिट’ आणि व्यक्त केलेला आनंद आता राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.

संबंधित बातम्या वाचा…

पवनराजे हत्याकांडातील सीबीआय कोर्टाचे 10 सर्वात मोठे खुलासे:माफीचा साक्षीदार अविश्वसनीय, मोबाईलचे सीडीआर गायब, अन् पोलिसांच्या घोडचुका

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआय (CBI) कोर्टाने आपला ऐतिहासिक निकाल देताना तपास यंत्रणा, पोलीस आणि सीबीआयच्या अत्यंत ढिसाळ कारभारावर प्रचंड कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या ‘माफीच्या साक्षीदारावर’ उभा होता, त्यालाच न्यायालयाने अविश्वसनीय आणि सोयीनुसार खोटे बोलणारा ठरवले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा एक मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्ट क्रमांक ५५ मध्ये पार पडलेल्या या सुनावणीतील १० सर्वात मोठे खुलासे आणि कोर्टाची सविस्तर निरीक्षणे येथे वाचा संपूर्ण बातमी

ऑपरेशन टायगर संकटात:ओमराजे म्हणाले – शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही, मतदारसंघात जावून चर्चा करून पुढचे ठरवणार!

‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर संकटात आल्याचे बोलले जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

पवनराजे हत्याकांड प्रकरणी एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये:थेट गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा; CBI हायकोर्टात जाणार

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या काही तासांतच आता देशपातळीवर मोठ्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्तीच्या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) वरिष्ठ न्यायालयात (हायकोर्टात) अपील करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी सीबीआयला थेट दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.