![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दिलीप खैरे यांनी मुंबई नाका येथील पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारला. या वेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करून नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकचा पक्ष बनवण्याचा व नाशिक जिल्ह्यात आगामी निवडणुकीत १० आमदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना खैरे म्हणाले की, संघटनात्मक हालचालींना वेग दिला जाईल. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि अपेक्षा वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दुवा म्हणून काम करू. येत्या आठ दिवसांत जिल्हाभर दौरे करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल.
Source link
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 10 आमदारनिवडून आणण्याचे लक्ष्य : दिलीप खैरे:पदभार स्वीकारताच संघटन बळकटीचा निर्धार