Headlines

थुंकण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन वाद:सख्ख्या भावांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची बाजारसावंगी गावात धिंड




तालुक्यातील बाजार सावंगी येथे थुंकण्यास विरोध केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन सख्ख्या भावांवर सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर खुलताबाद पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपींची शनिवारी बाजारसावंगी बाजारपेठेतून धिंड काढून कायद्याचा धाक दाखवला. बाजार सावंगी येथील एका चहाच्या हॉटेलमध्ये गुरुवारी थुंकण्यास विरोध केल्याने काही युवकांनी राग मनात धरला. त्यानंतर त्यांनी संबंधित दोन सख्ख्या भावांना गाठून लाकडी दांडे, लोखंडी रॉड व इतर हत्यारांच्या सहाय्याने मारहाण केली. या हल्ल्यात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक लॅबच्या पथकालाही पाचारण केले. अश्विन कारभारी नलावडे, अनिकेत गणेश नलावडे, मनोज अंकुश जाधव आणि आबाराव नलावडे यांना ताब्यात घेतले. तर बबलू शेख आणि शुभम देविदास सराटे हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. मुख्य आरोपी अनिकेत गणेश नलावडे याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी आरोपींची धिंड काढली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *