Headlines

गोकुळ गीतेंना आम्हीच मदत केली:नाशिक निकालानंतर राऊतांचा दावा, म्हणाले- भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडला




नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचा खुलासा करताना, “गोकुळ गीते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितले होते. आम्ही त्यांना मदत केली आणि आमचे मतदान त्यांच्या बाजूने वळवले. त्याचा त्यांना फायदा झाला,” असे राऊत यांनी सांगितले. गीतेंना मिळालेले मतदान लोकांच्या रोषाचा परिणाम
यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपमधील संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाशिकमध्ये उमेदवारी मागे घेतल्यानंतरही गोकुळ गीते यांना मिळालेले मतदान हा लोकांच्या रोषाचा परिणाम आहे. शिंदे गटाचे आणि भाजपाचे मतदार ठाण्यात ठेवले होते, मात्र त्यांनी मतदानाच्या दिवशी शिंदे गटाच्या विरोधातील उमेदवाराला मतदान केले,” असा दावा राऊत यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे हसू खोटे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधांवर भाष्य करताना, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे हसू खोटे आहे. दिल्लीतून शिंदेंना बळ दिले जात असून फडणवीस यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला. शिंदे गटाचा उमेदवार भाजपानेच पाडला
राऊत पुढे म्हणाले, शिंदे गटाचा उमेदवार भाजपानेच पाडला. गोकुळ गीते यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र लोकांनी त्याला उत्तर दिले. खासदार-आमदार फोडता येतील, पण आमची जिद्द आणि विचार संपवता येणार नाहीत, असे म्हणत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पुढील राजकीय निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राऊतांच्या दाव्यावर महाजनांचा पलटवार संजय राऊत यांच्या दाव्याबाबत विचारले असता गिरीश महाजन यांनी तो फेटाळून लावला. “संजय राऊत जे बोलत आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही,” असे स्पष्ट शब्दांत महाजन यांनी सांगितले. हे ही वाचा.. नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *