![]()
जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून शुक्रवारी पहिली यादी जाहीर झाली आहे. यंदा पहिलीच्या वर्गासाठी २६७३ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी मिळणार असून २८७२ जागांसाठी सोडत काढण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संदेश पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून पाल्यांच्या प्रवेशाच्या कागदपत्रांची खातरजमा करुन प्रवेश पत्र शाळेत दाखवल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. या तांत्रिक अडचणींमुळे थोडासा विलंब होऊ शकतो. शुक्रवारी रात्री उशिरा पासून पालकांना संदेश मिळू लागल्याने प्रवेशासाठी पालकांची लगबग वाढू लागली आहे. प्रवेश प्रक्रियेत अॉनलाइन अर्ज दाखल करताना पहिल्या टप्प्यात १ किलो मीटर अंतराची मर्यादा होती. ती ३ कि.मी. केल्यानेनंतर अर्जात वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील २८६ शाळांनी नोंदणी झाली असून यासाठी ६ हजार ७०९ पालकांनी ऑनलाइन अर्ज केलेले होते. अर्ज प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत सुरू होती, तर सोडत १० एप्रिल रोजी पूर्ण झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २० एप्रिलपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. ज्यांना संदेश मिळाला नाही, त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यादी तपासावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. ^जिल्ह्यातील २८६ शाळांतील २८७२ जागांसाठी २६७३ विद्यार्थ्यांची पहिली निवड यादी जाहीर झाली आहे. यासाठी पालकांना संदेश पाठविण्यात येत आहेत. ज्यांचे नाव यादीत आले नाही, त्यांनीही खात्री करून, प्रतीक्षा यादीची वाट पहावी. पालकांनी आवश्यक कागदपत्रे जमा करून गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावीत. कागद पत्रे पडताळणी करून योग्य असल्यास प्रवेश पत्र मिळेल. ते कार्ड घेऊन पाल्यांचा शाळेत प्रवेश करावा. कादर शेख, शिक्षणाधिकारी,सोलापू र. .आरटीई पोर्टलवर प्रवेशाची प्रिंट काढावी . जन्म, रहिवास, उत्पन्न, जात प्रमाणपत्र अनिवार्य . गटशिक्षणाधिकाऱ्यांकड ून पडताळणी करावी . आदेशपत्र घेऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावा अशी करावी प्रवेश प्रक्रिया शाळांना कागदपत्रे तपासायची गरज नाही पारदर्शकतेसाठी यंदा गुगल मॅपिंगचा वापर यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी “गूगल मॅपिंग’चा वापर करण्यात आला होता. घरापासून ३ कि.मी. अंतरावरील शाळांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. यामुळे स्थानिक स्तरावरील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, त्यांना २० एप्रिलपर्यंत संबंधित शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. तालुकानिहाय पात्र विद्यार्थी
Source link
‘आरटीई’मधून 2673 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची मिळणार संधी:गटशिक्षणाधिकारी करणार प्रवेशाच्या कागदपत्रांची खातरजमा