Headlines

छत्रपती संभाजीनगरात 19 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू:नातेवाईकांकडून घातपाताचा आरोप, चौकशीची मागणी




छत्रपती संभाजीनगर शहरातील जय भवानीनगरजवळील एसटी कॉलनी परिसरात एका 19 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हर्षद मधुकर जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव असून, रविवारी रात्री त्याचा मृतदेह राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मात्र, त्याचे हात बांधलेले असल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. हर्षद मधुकर जाधव हा पार्ट-टाईम नोकरी करत शिक्षण घेत होता. रविवारी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मृतदेह आढळला तेव्हा हर्षदचे हात घट्ट बांधलेले होते. यामुळे ही आत्महत्या नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास करावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *