Headlines

कळवण आगारातून सप्तश्रृंगगडासह नाशिकसाठी धावणार आधुनिक बस:5 ‘राजमाता जिजाऊ'' बस दाखल; आणखी 10 बस मिळणार‎




येथील एसटी महामंडळाच्या आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, या बसेसद्वारे कळवण-नाशिक आणि कळवण-सप्तश्रृंगगड मार्गावर सेवा दिली जाणार आहे. या बसेसचे लोकार्पण नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील दुर्गम भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या बसेस आगारात दाखल करण्यात आल्या आहेत. नवीन बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळणार असून, जुन्या बसेसवरील ताणही कमी होणार आहे. आगार व्यवस्थापक राहुल बोरसे यांनी सांगितले की, सध्या पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस आगाराला प्राप्त झाल्या असून, लवकरच आणखी दहा नवीन बसेस मिळणार आहेत. त्यामुळे आगाराची प्रवासीसेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. लोकार्पण सोहळ्यास हृषिकेश पवार, बाजार समिती सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नगरसेवक जयेश पगार, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पगार, भाजप शहराध्यक्ष सतीश पगार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. लोकार्पणानंतर नगराध्यक्ष कौतिक पगार व इतर पदाधिकाऱ्यांनी नवीन बसमधून कळवण शहरात फेरफटका मारला. प्रतिनिधी | लासलगाव नागरिकांना आधार कार्डाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या चांदवड उपविभागातर्फे लासलगाव येथे २९ व ३० जून रोजी दोन दिवसीय मेगा आधार सेवा महाशिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर भगरी बाबा मंदिर, लासलगाव-विंचूररोड येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. शिबिरात नवीन आधार नोंदणी मोफत केली जाणार आहे. तसेच नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक व ई-मेल आदी तपशीलांच्या अद्ययावतीकरणासाठी ७५, बायोमेट्रिक अद्ययावतीकरणासाठी १२५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय डाक विभागाने केले आहे. बसची अशी आहेत वैशिष्ट्ये ३ बाय २ आसन व्यवस्था, ५६ प्रवासी आसन क्षमता, ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन सुविधा, इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *