![]()
खरात बाबाचे प्रकरण साधे नसून त्याला मोठा राजकीय ॲंगल आहे. पोलिसांनी खरातकडून वधवून घेतलेली विधाने अत्यंत महत्त्वाची आहेत. कॉल डिटेल्स (CDR) सारखी अत्यंत गोपनीय माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या मदतीने बाहेर आली असून, कोणत्या नेत्याचे खरातशी किती वेळ बोलणे झाले, हे जाणीवपूर्वक प्रसिद्ध केले जात आहे, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, सीडीआर कोणी व्हॉटॲपवर पाठवत नाही. मी इतकी वर्षे खासदार आहे, पण मला कोणीही सीडीआर देणार नाही. ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहे ते गृहमंत्रालय किंवा मुख्यमंत्री यांच्या मदतीशिवाय तुम्हाला सीडीआर मिळू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना बळी घेण्याचा छंद आहे. ‘शिकार टप्प्यात आली की बार उडवायचा’ हे सुधाकरराव नाईक यांचे वाक्य होते. फडणवीस हे नाईक नसले, तरी त्यांना शिकारीची आवड मात्र नक्कीच आहे. त्यांच्या मते, खरातचे काय होणार हे स्पष्ट असले, तरी त्यानिमित्ताने जी ‘खरात फाईल्स’ समोर येत आहे, त्यातून मोठी राजकीय वादळे निर्माण होणार आहेत. खासदारांची मानहानी आणि कायदेशीर कारवाई ठाकरे गटाचे खासदार पक्षांतर करणार असल्याच्या वावड्यांवरही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. आमच्या खासदारांची नावे आणि फोटो वापरून ते इतर पक्षात जाणार असल्याचे सांगणे ही त्यांची मानहानी आहे. त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. एखाद्या केंद्रीय मंत्र्याने जेवणाचा कार्यक्रम ठेवला आणि त्याला सर्व खासदार गेले, म्हणजे ती ‘डिनर डिप्लोमसी’ ठरत नाही, असे राऊतांनी स्पष्ट केले. मोदींवर साधला निशाणा आंतरराष्ट्रीय विषयावर बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, ज्या देशाला आपण अडाणी म्हणतो, त्या पाकिस्तानने जागतिक भान काय असते, हे दाखवून दिले आहे. इस्लामाबादमध्ये सध्या जे सुरू आहे, त्याकडे संपूर्ण जग बघत आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका निभावली, तरीही कोणत्याही बॅनरवर पंतप्रधान किंवा इतर नेत्यांचे फोटो वापरलेले नाहीत. अशा प्रसंगी स्वतःची बॅनरबाजी कशी टाळावी, हे त्यांनी मोदींकडून शिकले पाहिजे.
Source link
फडणवीसांना शिकारीचा छंद, शिकार टप्प्यात आली की बार उडवतात:CDR थेट व्हॉटसॲपवर येतोच कसा? गृहखात्याच्या मदतीशिवाय हे अशक्य- संजय राऊत