![]()
शहरातील एचडीएफसी बँकेसमोर भरदिवसा १ लाख रुपयांच्या चोरीच्या प्रकरणातील दोन संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून, शहरात बँक ग्राहकांना लक्ष्य करणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंगळवारी कांदा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने बँकेतून १४ लाख ५० हजार रुपये काढल्यानंतर ती रक्कम दुचाकीच्या डिकीत ठेवली होती. याच वेळी दोन संशयितांनी त्याच्यावर पाळत ठेवून संधी साधत डिकी उघडून १ लाख रुपयांची रोकड लंपास केली. संपूर्ण प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये हे दोघे संशयित परिसरात रेकी करताना आणि नंतर दुचाकीजवळ येताना दिसत आहेत. त्यांच्या हालचाली पाहता त्यांनी आधीपासूनच ग्राहकावर लक्ष ठेवले असल्याचा संशय व्यक्त आहे. विशेष म्हणजे वैजापूर शहरात यापूर्वीही बँकांबाहेरून रोकड चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार एखाद्या मोठ्या रॅकेटचा भाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, आरोपी ताब्यात आल्यास शहरातील अशाच अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेकी करूनच चोरी केल्याचे उघड एचडीएफसी बँकेसमोर डिकी फोडून १ लाख रुपये चोरणाऱ्या दोन संशयितांचे चेहरे सीसीटीव्हीत स्पष्ट कैद झाले आहेत. पोलिसांनी फुटेजच्या आधारे शोधमोहीम सुरू केली असून, हे आरोपी सापडल्यास वैजापुरातील बँक ग्राहकांना लक्ष्य करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Source link
डिकीतील 1 लाख चोरीस; 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद:वैजापूरच्या बँकेसमोरील घटना, पोलिसांकडून तपास सुरू