![]()
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी ठरवून होत नाही. प्रेम अशी गोष्ट आहे जिला काही मर्यादा नाही. प्रेम अशी गोष्ट आहे जी व्यक्त करावीही लागते आणि व्यक्त करावीही लागत नाही. प्रेम असेल तर डोळ्यातला संवादही पुरेसा असतो.. पण आजच्या कॉर्पोरेट जगात प्रेम करणं जरासं कठीण झालं आहे का? एकाच ठिकाणी काम करत असताना आपल्याला कोणीतरी आवडायलाही लागू शकतं, ते आवडणं नंतर प्रेमात रूपांतरही होऊ शकतं.. पण त्या कंपनीतल्या पॉलिसी प्रेमाच्या आड येत असतील तर..? आशीच एक भन्नाट सिरिज मराठी ZEE5 घेऊन आली आहे आपल्या सर्वांच्या भेटीला, जिचं नाव आहे – प्रेमाला कंडिशन्स अप्लाय! आता याविषयी मी अधिक बोलण्यापेक्षा आपण यातले प्रमुख कलाकार – अभिनेता सिद्धार्थ मेनन, अभिनेत्री जान्हवी उदय आणि दिग्दर्शक गौरव पत्की यांच्याकडूनच या सिरिजविषयी जाणून घेऊया. स्वागत आहे, तुम्हा सर्वांचं दिव्य मराठी डिजिटलमध्ये! 1. प्रेमाला कंडिशन्स अप्लाय या सिरिजविषयी आणि यातल्या भूमिकेविषयी मला सिद्धार्थकडून जाणून घ्यायला आवडेल. ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ मधील आपल्या भूमिकेविषयी सांगताना सिद्धार्थने सांगितलं की, प्रेमाला कंडिशन्स अप्लाय, अप्लाय शब्द सुद्धा यात वापरला आहे, याचं कारण म्हणजे त्या प्रेमाच्या कंडिशन्स खऱ्या अर्थानं माझ्या पात्रावर अप्लाय झाल्या आहेत. प्रेमाच्या साइडने सुद्धा आणि कॉर्पोरेटच्या साइडने सुद्धा. यात माझं जे पात्र आहे ऋषी नाव आहे त्याचं, त्याच्यावर हे जे अॅप्लिकेशन झालं आहे ते तो कसं नॅव्हिगेट करतो, हे या सिरिजचा खूप महत्त्वाचा भाग आहे. पुढे सांगताना सिद्धार्थने सांगितलं की, ऋषी हा अगदी फोकस्ड आणि अॅम्बिशस मुलगा आहे. जो घर सोडून मुंबईला आलेला आहे आणि तो 3-4 वर्षं तिथं काम करतो आहे. एक दिवस त्याच्या आयुष्यात एक सर्प्राइज अनन्याच्या पात्राने आणि त्याचं सगळं इंटरनल वर्ल्ड आणि हळूहळू एक्सटर्नल वर्ल्ड पण चांगल्या प्रकारे ती हलवते, जे त्याला आवडतं सुद्धा. अनन्यामुळे त्याच्यातले बदल, त्याच्या अॅम्बिशन्सला ते कसं अफेक्ट करत आहे कारण तो सुद्धा अनन्याला इग्नोर करू शकत नाही आणि अनन्याला पण त्याच्याबद्दल तसंच वाटत आहे. ऋषी, अनन्या आणि त्यांच्या ऑफिसमधले इतर पात्र आणि त्यांच्या कॉर्पोरेटमधले डे-टु-डे लाइफ यावर हे सगळं आहे. 2. माझा सेम प्रश्न जान्हवीला सुद्धा विचारायचा आहे, काय आहे भूमिका? यात एकदम फास्ट फॉरवर्ड असं कॅरेक्टर असल्याचं मला समजलं आहे, तर काय सांगशील? आपल्या भूमिकेविषयी सांगताना जान्हवी सांगते, अनन्या ही खूप लव्हिंग केअरिंग आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी अशी मुलगी आहे. आणि मग ती भेटते एका ऋषीला, आणि मग तिचं सगळं जे कामाविषयी आणि तिचं कॉलिंग ती शोधत असते आणि ते थोडं इथे पण (ऋषीकडे) जातं आणि मग ती स्वतःला शोधते. ऋषीमुळे तिच्यात काय बदल होतात, तिच्या स्वभावात, तिच्या बोलण्यात, तिच्या वर्क लाइफमध्ये आणि ती कसं प्रेम आणि काम बॅलेन्स करून ती कशी ग्रो होते, ही तिची जर्नी आहे. हे तर सध्या फक्त सरफेस लेव्हलला आहे. कारण 50 एपिसोड आहेत आपल्याकडे आणि आहे हे छान छान अनन्या आणि ऋषीचं.. पुढे सांगताना जान्हवी सांगते की, अनन्या ही फ्री आहे, म्हणजे तिला कुठल्या अशा सीमा नाहीत. जे आहे ते तोंडावर बोलते. जे कॉर्पोरेटमध्ये एवढं वेल्कमिंग नाही. पण तुम्हाला कळेल ती कधी, कुठे कशी काय बोलते. 3. आता या सगळ्याची उत्कृष्ट अशी सांगड घालणारे दिग्दर्शक गौरव पत्की यांना मला विचारायचं आहे की, ‘प्रेमाला कंडिशन्स’ ही सिरिज दिग्दर्शित करताना नेमका काय विचार होता? दिग्दर्शनाच्या विषयी सांगताना दिग्दर्शक गौरव पत्की यांनी सांगितलं की, मला तर खूप मजा आली, येतीये आणि पुढेही मजा येत राहणार आहे. यातले जे काही पात्रं आहेत, त्या सगळ्यांना डिरेक्ट करताना मजा आली. 4. या आधी ललित प्रभाकर आणि हृता दुरगुले या जोडीसोबत काम केल्याचा अनुभव आणि या नवीन जोडीचा म्हणजे सिद्धार्थ आणि जान्हवी यांच्यासोबतच्या अनुभवाविषयी काय सांगाल? दोन्ही वेळेस वेगवेगळे अनुभव आले. दोन्ही जोडी सोबत काम करताना छान वाटलं. आता असं तर होणार नाही की दोन्हीकडे सेम सेनारीओ आहे. वेगवेगळ्या प्रकारचा मोड, वेगळी गोष्ट होती. पण एकंदरीतच दोघांसोबतही काम करताना मजा आली. 5. प्रेमाला कंडिशन्स असणं कितपत योग्य आहे? आणि बिनधास्त असणारी जेनझी पिढी या कंडिशन्स फॉलो करू शकतील? या प्रश्नावर उत्तर देताना सिद्धार्थने सांगितलं की, प्रेमाला कंडिशन्स नसल्या पाहिजेत. पण माणूस म्हणून आपल्या नेहमी अपेक्षा असतात. मी कुठेतरी असं वाचलं होतं की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, ती सगळ्यात जास्त आपल्याला ट्रिगर करत असते. आणि ज्या गोष्टी आपल्याला ट्रिगर करतात अल्टीमेटली सेल्फ ग्रोथचा एक टूल बनू शकतो, जर त्या अनुषंगाने तुम्ही बघितलं तर. पुढे बोलताना सिद्धार्थने म्हटलं की, माझे अनेक मित्र आहेत जेन-झी. ते ऑनेस्टीला धरून आहेत आणि म्हणून ते या सगळ्याला प्रश्न विचारू शकतात, जी खूप चांगली गोष्ट आहे. मी 90’s कीड आहे, आपण सगळेच. तर मलाही त्यांच्यासारखी मजा येतीये, या सगळ्या गोष्टींना प्रश्न करायला. जे प्रश्न विचारतात न त्यांना आपण सिरियसली घेत नाही आणि त्यांना आपण हाडतुड करतो आणि त्यांना सांगतो की ते असं नसतं. पण ते तसं नसतं, प्रश्न विचारणं याचा अर्थ असा आहे की त्यांना अजून जाणून घ्यायचं आहे याविषयी आणि जोवर ते त्यावर पोहोचत नाहीत तोपर्यंत ते सॅटिस्फाईड नाहीयेत. आणि ही चांगली गोष्ट आहे कारण नंतर आपण फेक बनतो. आपण प्रिटेंड करतो की आपल्याला काहीतरी पटतय आणि जर आपल्याला पटत नसेल सुद्धा. पुढे बोलताना सिद्धार्थ म्हणाला, हे जे काही आहे ते सगळं आमच्या सिरिजमध्ये आहे आणि म्हणून सुद्धा मला मजा येत आहे. कारण ते करत असताना आम्ही फक्त येऊन ते सीन करत नाही, त्यावर चर्चा करत असतो. अनेकवेळा पुन्हा शूट करावं लागलं आहे. आणि ती एक प्रक्रिया आहे कारण आम्हाला सगळ्यांना काहीतरी वाटत असतं. दिग्दर्शक गौरव पत्की यांनी सांगितले की, या शोच्या निमित्ताने तुझा जो प्रश्न होता कंडिशन्स असतील तर प्रेम नाही करू शकत. प्रेम हे अनकंडिशनल असलं पाहिजे. तर त्याला जेव्हा कंडिशन्स लागतात तेव्हा काय घडतं तर गोष्ट घडते, जी आपण करत आहोत. 6. प्रेमाला कंडिशन्स या सिरिजविषयी दिव्य मराठीच्या वाचकांना आणि प्रेक्षकांना काय सांगाल? सिद्धार्थ यावर उत्तर देताना म्हणाला की, किती वेगळं किंवा किती नाही याविषयी मी कॉमेंट करणार नाही. आम्ही सगळे अतिशय ट्रू लव्ह स्टोरी घेऊन येत आहोत. खूप वर्षांनी अशा प्रकारची लव्ह स्टोरी मला वाचायला मिळाली. मला त्यात अभिनय करायला मिळाला. आम्ही सगळ्यांनीच याकडे आधी एक प्रेक्षक म्हणून बघितले आणि आपल्याला काय वाटत आहे. गौरव जसं मघाशी म्हणाला तुम्ही 5 एपिसोड पाहा तुम्ही हुक व्हाल. तर दिव्य मराठीच्या प्रेक्षकांना आणि वाचकांना एवढेच सांगेल की ही सिरिज नक्की बघा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल आणि प्रेम करा. सिरिजविषयी थोडक्यात समीक्षण ऋषी (सिद्धार्थ मेनन) हा एका टिपिकल कॉर्पोरेट जगात वावरणारा तरुण आहे, तर दुसरीकडे अनन्या (जान्हवी उदय) ही नुकतंच कॉलेज संपवून कॉर्पोरेट विश्वात पदार्पण करण्यास सज्ज असलेली एक फ्रेशर आहे. सीरिजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये निखिलने (मनमित पेम) आयोजित केलेल्या एका पार्टीत या दोघांची पहिल्यांदा भेट होते. आजच्या ‘जेन-झी’ (Gen-Z) पिढीच्या स्वभावानुसार, या पहिल्याच भेटीत ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि त्यांच्यात सगळं कसं अगदी ‘इन्स्टंट’ घडतं. पार्टीतील या भेटीनंतर कथेत एक रंजक योगायोग घडतो. दुसऱ्याच दिवशी या दोघांची पुन्हा थेट ऋषीच्या ऑफिसमध्ये भेट होते, कारण अनन्या त्याच कंपनीत ऋषीच्याच टीममध्ये इंटर्न म्हणून रुजू होते. आता इथून पुढे या दोघांचा ऑफिस रोमान्स बहरेल, असा अंदाज प्रेक्षक बांधत असतानाच कथेत एक मोठा ट्विस्ट येतो; तो म्हणजे कंपनीची ‘नो डेटिंग’ (No Dating) पॉलिसी! कामाच्या ठिकाणी प्रेमप्रकरणांना असलेली ही एचआरची (HR) सक्त मनाई ऋषी आणि अनन्याच्या फुलणाऱ्या प्रेमात कोणता अडथळा आणते? आणि त्यांच्या या नात्याचं पुढे नेमकं काय होतं? या सर्व प्रश्नांची रंजक उत्तरे जाणून घेण्यासाठी ही सीरिज पाहावी लागेल.
Source link
दिव्य मराठी विशेष:जेव्हा ऑफिसमधल्या प्रेमाला असतात 'कंडिशन्स अप्लाय'! सिद्धार्थ, जान्हवी आणि गौरव पत्की यांच्याशी खास गप्पा!