Headlines

नागरिकांना दिलासा:लासूर स्टेशन परिसरातील 4,500 कुटुंबांना घरपोच रेशनकार्डचे वाटप




परिसरातील साडेचार हजार कुटुंबांना रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांच्या मंजुरीपत्रांचे थेट घरात जाऊन वाटप करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल रमेश पाटील जाधव यांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, परिसरातील घराघरांमधील लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकीची जपणूक करत आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली २०२० मध्ये भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल पाटील जाधव यांनी गोरगरिबांची कामे मोफत आणि सुलभतेने व्हावीत, या उद्देशाने संगणकीय ज्ञान असलेल्या ऑपरेटरसह जनतेच्या सेवेसाठीकार्यालय सुरू केले होते. गेल्या पाच वर्षांपासून या कार्यालयाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा थेट लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी जाधव पुढाकार घेत आहेत. नुकत्याच राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा, यासाठी अमोल जाधव यांनी शासनाच्या नारीशक्ती पोर्टल ॲपवर आपल्या कार्यकर्त्यांची भक्कम टीम उभी करून हजारो अर्ज भरून घेतले आणि बहिणींना लाभ मिळवून दिला. लासूर भागातील नागरिकांना रेशनकार्ड, संजय गांधी किंवा श्रावणबाळ योजनेच्या कामासाठी ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगापूर तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असत. अनेकदा चार-चार फेऱ्या मारूनही कामे होत नसत. सर्वसामान्यांची हीच अडचण लक्षात घेऊन अमोल पाटील यांनी जनतेच्या सेवेचा संकल्प सोडला आणि उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष नागरिकांच्या घरी जाऊन तयार झालेले रेशनकार्ड आणि मंजुरीपत्रे सुपूर्द करण्यात येत आहेत. २३४९ आयुष्मान कार्ड या उपक्रमांतर्गत १,१४० कुटुंबांना नवीन रेशनकार्ड वितरीत करण्यात आले. तसेच संजय गांधी व श्रावणबाळ योजना ७४७ लाभार्थी, आयुष्मान भारत कार्ड २,३४९ नागरिक, कामगार शिष्यवृत्ती प्रकरणे ३७३ विद्यार्थी, दिव्यांग प्रमाणपत्रांचे ३० लाभार्थींना वाटप करण्यात आले. जाधव यांच्या कार्यालयात कागदपत्रे दिली. आज थेट माझ्या घरी येऊन मंजुरीपत्र हातात मिळाल्याने आनंद झाल्याचे असल्याचे बेबीताई बनकर यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *