Headlines

संभाजीनगरसह देशभरातील 11 विमानतळांचे खासगीकरण होणार:50 वर्षांचा करार, 8,622 कोटींची गुंतवणूक; 60% कर्मचारी 3 वर्षे सेवेत कायम


  • Marathi News
  • National
  • 11 Airports Across The Country Including Sambhajinagar Will Be Privatized, 50 year Contract, Investment Of Rs 8,622 Crore; 60% Employees To Remain In Service For 3 Years

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

केंद्र सरकार सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत छत्रपती संभाजीनगरसह ११ विमानतळ खासगी कंपन्यांकडे सोपवण्याच्या तयारीत आहे. हे विमानतळ ५ गटांमध्ये विभागले जातील. नागरी हवाई वाहतूक मंत्राल्याने ११ विमानतळांसाठी खासगी भागीदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव तयार केला आहे.

त्यानुसार प्रत्येक गट एकाच कंत्राटदाराला दिला जाईल. यात ५ मोठ्या विमानतळांसोबत ६ लहान विमानतळ जोडले जातील. ते ५० वर्षांच्या करारावर दिले जातील. बाजारातील एकाधिकार टाळण्यासाठी एकाच कंत्राटदारांकडून एकूण ८,६२२ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी मूल्यमापन समितीनेही या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

खासगीकरणाच्या अटी

खासगीकरण प्रक्रियेनंतर विमानतळ प्राधिकरण कर्मचाऱ्यांसाठी एक वर्षाचा संयुक्त व्यवस्थापन कार्यकाळ देण्याचा प्रस्ताव आहे. दस्तऐवजांनुसार, ‘कंत्राटदाराला तीन वर्षांपर्यंत प्राधिकरणाच्या ६०% कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवावे लागेल. यापूर्वीच्या टप्प्यात एक वर्षाचा संयुक्त व्यवस्थापन कार्यकाळ व दोन वर्षांचा प्रतिनियुक्ती कार्यकाळ दिला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *