![]()
महानगरपालिकेत उपायुक्त पदावर भाग्यश्री बोरेकर यांनी बुधवार २४ रोजी रुजू झाल्या. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांची भेट घेवून त्यांनी उपायुक्त या पदाचा पदभार स्विकारला. त्या भातकुली नगर पंचायत येथे मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपस्थित होते.यापूर्वी भाग्यश्री बोरेकर यांनी महानगर पालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर काही वर्ष काम केले आहे. त्याचप्रमाणे गुरुवार २५ रोजी महानगरपालिकेच्या मुख्य लेखापाल म्हणून शिल्पा पवार यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी मुख्य लेखापरीक्षक शामसुंदर देव यांच्याकडून पदभार घेतला. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पवार यांच्या रुजू होण्याने मनपाच्या आर्थिक व लेखा विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून महसूल व्यवस्थापन, लेखा नियोजन व आर्थिक शिस्त बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Source link
मनपाच्या उपायुक्तपदी भाग्यश्री बोरेकर, तर मुख्य लेखापालपदी शिल्पा पवार झाल्या रुजू