![]()
नागपूर रेल्वे मंडळाने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करत गेल्या १७ महिन्यांत २४ कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीत नागपूर रेल्वे मंडळांतर्गत तिकीट तपासनीसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान एकूण ३,३५,१९७ प्रवासी विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करताना आढळले. या सर्व प्रवाशांकडून रेल्वेने दंडाच्या स्वरूपात २४ कोटी ४९ लाख २४ हजार ६६८ रुपये जमा केले आहेत. ही कारवाई मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने केली आहे. याच १७ महिन्यांच्या काळात नागपूर रेल्वे मंडळाला होर्डिंग्स, डिजिटल डिस्प्ले आणि इतर रेल्वे जाहिरातींमधून २ कोटी ९१ लाख ७२ हजार रुपये (२९१.७२ लाख) एवढा महसूल मिळाला. या आकडेवारीनुसार, रेल्वेला जाहिरातींमधून मिळणाऱ्या २.९१ कोटी रुपयांच्या तुलनेत विनातिकीट प्रवाशांच्या दंडातून तब्बल २४.४९ कोटी रुपये मिळाले आहेत. म्हणजेच, जाहिरातींच्या उत्पन्नापेक्षा २१ कोटी ५७ लाख रुपये अधिक केवळ दंडातून वसूल झाले आहेत.
Source link
नागपूर रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून 24 कोटी वसूल केले:जाहिरातींपेक्षा 21 कोटी अधिक दंडातून मिळाले