Headlines

विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास साधावा- शिंदे:खडांबे येथील विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी‎




राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. सर्व समाजघटकांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी त्यांनी अनेक लोकहितकारी निर्णय घेतले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा, असे आवाहन प्राचार्य अप्पासाहेब शिंदे यांनी केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री शाहू विद्या मंदिर खडांबे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी अशोक उंडे, कृषिभूषण सुरसिंग पवार, बाळासाहेब लटके, यशवंत ताकटे, श्‍यामराव खेसम्हाळसकर, मच्छिंद्र सोनवणे, बाळासाहेब जठार, अनशाबापू आवारे, भाऊसाहेब खळेकर, अर्जुन खळेकर आदी उपस्थित होते. विद्यालयाच्यावतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्य, सामाजिक सुधारणा आणि शैक्षणिक क्रांतीवर आधारित भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब शिंदे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. सर्व समाजघटकांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी त्यांनी अनेक लोकहितकारी निर्णय घेतले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप भोरुंडे, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *