![]()
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विशेषत: रविवारी (28 जून) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असेल,असा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, रविवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून पुण्यासह रायगड, रत्नागिरी आणि अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावेल. संभाजीनगर, नाशिक, बीडचाही समावेश ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.
Source link
राज्यभरात सहा दिवस पावसाचा यलो अलर्ट:मध्य महाराष्ट्र, कोकणात जोर अधिक