![]()
हल्लीच्या ताण तणावामुळे भारतीयांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. युवापिढीतही अकाली मृत्युचे प्रमाण गंभीर आहे. तेव्हा प्रत्येकाने आरोग्याच्या काळजीपोटी नियमीत तपासण्या केल्याच पाहिजेत. संजीवनी, आर. जे. एस. हॉस्पीटलच्या सहकार्यातून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी मनोगत व्यक्त केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पीटल, संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान, आरोग्य, रक्तदान शिबीर व मोफत औषधांचे वाटप उपक्रम व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. साहिल माळी यांनी विविध आजार व त्यासंबंधीच्या उपचाराची माहिती देऊन आर.जे.एस हॉस्पिटलमध्ये शासनाच्या सहकार्याने कर्करोगावरील वैद्यकीय उपचार चांगल्या प्रकारे केले जातात. तेव्हा कर्करोगग्रस्त रुग्णांनी या आधुनिक उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. संधान पुढे म्हणाले, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांचा वाढदिवस सेवा हाच धर्म या माध्यमातून सर्वत्र साजरा होत आहे. लहान मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी त्यांनी जवळके येथे महिनाभर निवासी शिबीर राबवून त्यांना पोषण आहार पुरवला होता. अलीकडे मधुमेह-हृदयविकार, कर्करोग, संसर्गजन्य आजार, क्षयरोग, तापजन्य आजार, श्वसनाचे विकार, कुपोषण आदींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावरील वैद्यकीय उपचार मध्यमवर्गीयांना परवडत नाही. त्यामुळे बिपीन कोल्हे यांचे संकल्पनेतून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, वैभव आढाव, राजेंद्र सोनवणे, विशाल गोर्डे, दिलीप दारुणकर, बाळासाहेब नरोडे, अतुल काले, विनोद राक्षे, संजय उदावंत आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या शिबिराला कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तसेच या नागरिकांना योग्य औषधोपचार सांगितले तसेच आरोग्याबाबत सविस्तर माहिती दिली. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून डॉक्टरांनी आरोग्य तपासणी तर केलीच शिवाय आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याने शिबिरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तालुका व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णांनी आधुनिक उपचार घ्यावे शिबिराच्या प्रारंभी डॉ. साहिल माळी यांनी विविध आजार व त्यासंबंधीच्या उपचाराची माहिती देऊन आर.जे.एस हॉस्पिटलमध्ये शासनाच्या सहकार्याने कर्करोगावरील वैद्यकीय उपचार चांगल्या प्रकारे केले जातात. तेव्हा कर्करोगग्रस्त रुगणांनी या आधुनिक उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या शिबिराला कोपरगावमधील व तालुक्यातील नागरिकांनी प्रतिसाद दिला.
Source link
प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक:कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान यांचे प्रतिपादन, आरोग्य शिबिराला प्रतिसाद