Headlines

विठ्ठल भक्तांसाठी 18 महिन्यांत दर्शन मंडप, स्काय वॉक उभारणार:624 मीटर लांबीच्या कामाला 103 कोटी 79 लाखांच्या निधीतून गती


.

पंढरपुरात येणाऱ्या लाखो विठ्ठल भक्तांसुलभ, सुखकर दर्शनासाठी, दर्शन रांग सुटसुटीत, सुव्यवस्थित करण्यासाठी नवीन दर्शन मंडपाचे काम सुरु करण्यात आलेले असून येत्या १८ महिन्यात भव्य दर्शन मंडप, स्काय वॉक बांधून पूर्ण होईल अशा गतीने काम सुरु करण्यात आलेले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ऊन, वारा, पाऊस, थंडी पासून सुटका करण्यासाठी आणि विठ्ठल दर्शन सुखाचे करण्यासाठी मंदिर समितीने तिरुपती बालाजी च्या धर्तीवर नवीन दर्शन मंडपाचे काम हाती घेतले आहे. स्मशान भूमी जवळ असलेल्या पत्राशेड दर्शन रांगेच्या बाजूला हा नवीन दर्शन मंडप उभा राहत आहे. यासाठी राज्य शासनाने १०३ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी दिला. मंदिर समितीकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित आराखड्यानुसार, हा दर्शन मंडप अतिशय देखणा आणि पारंपरिक दगडी वास्तुकलेचा फील देणारा असेल. त्यावर विठ्ठल-रुक्मिणीच्या आणि संतांच्या सुंदर प्रतिमा रेखाटण्यात येणार असून एकाच वेळी हजारो भाविक यामध्ये सुलभतेने थांबू शकतील. तसेच नवीन ६२४ मीटर लांबीचा स्काय वॉक उभा करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना गर्दीतून न जाता सुरक्षितपणे चालत येणे शक्य होईल. {क्षेत्रफळ: १६ हजार चौरस मीटरचा २ मजली दर्शन मंडप. {स्काय वॉक: दर्शन मंडप ते विठ्ठल मंदिर पूर्व प्रवेशद्वार असा १०५० मीटर्स लांबीचा स्काय वॉक. {क्षमता: प्रत्येक मजल्यावर १५०० भाविक क्षमतेचे दोन हॉल (वातानुकूलित हॉल). {सुविधा: दर्शन मंडपास ६ लिफ्ट आणि २ रॅम्प, सीसीटीव्ही, ३० पास स्कॅनिंग काउंटर, हिरकणी कक्ष, उपहार गृह आदी. {टोकन सुविधा: हा दर्शन मंडप उभा राहिल्यानंतर टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात येईल. ६ हजार भाविकांची सोय होणार.

पारंपरिक दगडी वास्तुकलेचा देणारा फील



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *