Headlines

प्रगतिशील शेतकरी:आंतरपीक शेवग्याच्या पानांपासून दरमहा 40 हजारांचा नफा‎, अमरावतीच्या वरूड येथील शेतकऱ्याचा संत्रा बागेत शेवगा व लक्ष्मीतरूच्या लागवडीचा प्रयोग‎


पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित‎उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण‎‎शेतकऱ्याने संत्रा बाग कायम‎‎ठेवत त्यामध्ये मोरिंगा‎‎(शेवगा) आणि लक्ष्मीतरू‎‎यासारख्या आंतरपिकांची‎‎लागवड केली. या‎‎प्रयोगामुळे त्यांना दरमहा‎‎किमान मजुरी खर्च ज

.

अमरावती‎जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अजिंक्य खेरडे (३५) यांच्या प्रयाेगाचे सर्वत्र‎काैतुक हाेत अाहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत‎शिक्षण घेतले.

काही वर्षे पुणे आणि नागपूर येथे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎खासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यांच्याकडे‎वरूडपासून जवळच असलेल्या जरूड येथे‎चार एकर शेती अाहे. मागील काही वर्षांत‎हवामानातील बदल, बाजारातील चढ-उतार‎आणि संत्र्याच्या निर्यातीवरील परिणाम पाहता‎त्यांनी बारामतीतील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहून‎संत्रा बागेत आंतरपीक घेतले. त्यांनी संत्रा‎बागेत शेवग्याच्या ‘वलय पट्टी’ प्रकाराची तसेच‎लक्ष्मीतरू, बीट या वनस्पतीचीही लागवड‎केली. या प्रकारात शेंगांपेक्षा पानांचे उत्पादन‎अधिक मिळते. मोरिंगाच्या पानांमध्ये औषधी‎गुणधर्म असल्याने त्याला बाजारात चांगली‎मागणी आहे. वर्षातून तीन वेळा पानांची‎कापणी केली जाते. ही पाने सुकवून त्यांची‎पावडर तसेच टॅबलेट तयार करून विक्री केली‎जाते. ऑनलाइन माध्यमातूनही या उत्पादनांची‎खेरडे विक्री करत आहेत.‎

शेवग्याच्या पानांच्या पावडरचे अार्थिक गणित‎

मोरिंगाच्या बिया आणून लागवड करण्यासाठी सुरुवातीला‎फक्त १५ हजारांचा खर्च आला. त्यानंतर वर्षातून तीनदा कापणी‎केली जाते. सुकवलेल्या पानांची पावडर सरासरी किमान २००‎रुपये प्रतिकिलो विकली जाते. आंतरपीक पद्धतीतून पहिल्या‎कापणीत सुमारे एक क्विंटल, दुसऱ्या कापणीत १३० किलो‎आणि तिसऱ्या कापणीत १५० किलो उत्पादन मिळाले. चौथ्या‎कापणीत यापेक्षाही अधिक उत्पादनांची अपेक्षा आहे.‎लक्ष्मीतरू पावडरला ५ ते ७ हजार प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो.‎विशेष म्हणजे त्यांनी ८ ते १० तरुणांनाही रोजगार दिला आहे.‎

आपणही शेतकरी आहात. अनोख्या प्रयोगांची संपूर्ण माहिती, छायाचित्र-व्हिडिओ आपल्या नाव व पत्त्यासह 8888840081 या व्हॉट्सअॅपवर पाठवावी. मात्र ही माहिती यापूर्वी वृत्तपत्रात, सोशल मीडियावरही प्रसिद्ध झालेली नसावी.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *