Headlines

पालखेडला शालेय साहित्य वाटप:पोलिसांत भरती झालेल्यांचा सत्कार




प्रतिनिधी | बोर दहेगाव वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती प्रतिष्ठानच्या वतीने शाळेतील ३०० विद्यार्थ्याना वही, पेन, रजिस्टरचे वाटप करण्यात आले. तसेच पोलिस दलात निवड झालेल्या वैष्णवी अशोक भाडाइत, कल्याणी दत्तू रोठे यांचा तसेच प्रशिक्षक प्रा. राजू शेळके यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन चरित्राविषयी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. नागरिकांची कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थांना प्रोत्साहित करणारे शैक्षणिक उपक्रम शाळेमध्ये राबविले जाईल असे क्रांतिज्योती प्रतिष्ठानचे रवींद्र घोडके यांनी सांगितले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य राहुल शेळके, सर्व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, सर्व संचालक मंडळ, शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, समिती सदस्य, क्रांतिज्योती प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. आभार केंद्रीय मुख्याध्यापक रामेश्वर राऊत यांनी मानले. विद्यार्थ्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *