![]()
महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेच्या समृद्ध आणि रचनात्मक शैक्षणिक कार्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील सक्रिय व प्रतिष्ठित ‘अग्रज नाट्य दल संस्थेच्या वतीने आयोजित योगेश स्मृती
.
बिलासपुर येथील सीआयएमएस ऑडिटोरियममध्ये २६ ते २९ जून २०२६ दरम्यान हा सोहळा झाला. विशेष गौरव समारंभात बिलासपूरचे समाजसेवक व माजी महापौर अनिल टाह (शोभा फाउंडेशनचे संस्थापक), आधारशिला ग्रुपचे चेअरमन डॉ. अजय श्रीवास्तव, आकाशवाणी प्रमुख डॉ. सुप्रिया भारतीयन, अग्रज नाट्य दलाचे निर्देशक विभा पांडे, सुनील चिपडे, सचिव श्वेता पांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशस्वी उपक्रमासाठी आणि सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी केंद्रप्रमुख केशव गायकवाड, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे व गटविकास अधिकारी शुभम जाधव यांचे प्रशासकीय सहकार्य लाभले. तसेच जिवलग मित्र संदीप राठोड यांचेही विशेष सहकार्य लाभल्याचे शिक्षक बोराटे यांनी सांगितले.
हा बहुमान प्रत्येक शिक्षणप्रेमीचा…
हा राष्ट्रीय बहुमान केवळ एका शिक्षकाचा गौरव नसून जि. प. धनगरवस्ती आणि हनुमाननगर (भारजवाडी) शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा, शाळेवर मनापासून प्रेम करणाऱ्या पालकांचा आणि महाराष्ट्रात शिक्षणाची चळवळ जिवंत ठेवणाऱ्या प्रत्येक शिक्षणप्रेमी नागरिकांचा आहे. दुर्गम भागात प्रामाणिकपणे धडपडणाऱ्या सर्व शिक्षकांच्या कष्टांचा हा राष्ट्रीय आदर आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षक लहू बोराटे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली. बिलासपूर येथील आधारशिला विद्या मंदिर न्यू सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षक बोराटे म्हणाले, मर्यादित संसाधने असलेल्या शाळांमधील विद्यार्थीही योग्य मार्गदर्शन, नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धती आणि प्रयत्नांच्या जोरावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्यांत असीम क्षमता असतात, गरज असते ती फक्त स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. शिक्षणाचा खरा उद्देश केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवणे हा नसून, एक जबाबदार, संवेदनशील, कल्पक अन् आत्मनिर्भर नागरिक घडवणे हा आहे. विद्यार्थ्यांनी आव्हानांना न घाबरता त्यावर उपाय शोधावेत, प्रत्येक अपयशाकडे शिकण्याची नवीन संधी म्हणून पहावे. पर्यावरणप्रेमी शिक्षक संदीप राठोड यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत मार्गदर्शन केले.
आपल्यातील क्षमता ओळखा, स्वत:वर विश्वास ठेवा