![]()
मुंबई-पुणे महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकवर (मिसिंग लिंक) पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. या पूर्वी काही दिवसांपूर्वीच या मार्गावर तीन गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला होता. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. आता देखील मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका कारवर कनेक्टिंग लिंकच्या बोगदा क्रमांक दोनमध्ये दोन ते तीन दगड पडले. त्यामुळे कारची पुढची काच फुटली असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकीच्या पुढच्या काचेवर कनेक्टिंग लिंकमधील बोगदा क्रमांक 2 मध्ये दोन ते तिज दगड पडल्याने कारची समोरील काच फुटली आहे. कारचालक उचप्पा खतनाप्पा वरचल्ली (वय 53, रा. खोपोली, रायगड) यांच्या अंगावर कारच्या फुटलेल्या काचा पडल्या. या प्रकरणी कारचालकाने तक्रार दाखल केली नाही. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलिस उपनिरीक्षक समीर कटपाळे, महाराष्ट्र सुरक्षा कर्मचारी सुरेश ढेरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वीच या नव्यानेच सुरू झालेल्या कनेक्टिंग लिंकवर अपघात झाला होता. मिसिंग लिंकवर असलेल्या पुलावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला होता. तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला होता. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील महामार्गावर काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. नव्यानेच सुरू झालेल्या मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात:तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, जीवितहानी टळली; वाहतूक विस्कळीत
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्यानेच सुरू झालेल्या मिसिंग लिंकवर असलेल्या पुलावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील महामार्गावर काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून तिन्ही गाड्या पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. मिसिंग लिंकवरील केबल स्ट्रे पुलाजवळ तिसऱ्या मार्गिकेवर या गाड्यांमधील फॉर्च्यूनर गाडी अचानक मध्येच थांबली. त्यामुळे मागून येणारी हुंदाईची वेरना कार वेगाने येऊन फॉर्च्यूनर गाडीवर जाऊन धडकली. यानंतर वेरना गाडीने आणखी एका कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने गाड्यांमधील प्रवाशांनी सीट बेल्ट लावले होते, तसेच गाडीतील एअर बॅग्स उघडल्याने जीवितहानी टळली आहे. वाचा सविस्तर
Source link
मुंबई-पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवर पुन्हा अपघात:बोगद्यातून चालत्या कारवर दोन ते तीन दगड पडले; काही दिवसांपूर्वीच झाला होता अपघात