![]()
शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे आहे. ते काँग्रेस किंवा भाजपसोबत स्वतंत्रपणे जातील असे मला वाटत नाही. लोकसभा आणि आगामी विधानसभेत पवारांचा पक्ष, काँग्रेस आणि आम्ही एकत्रच आहोत, असे उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांच्या सल्ल्यांबाबत विचारले असता, राऊत हे शिवसेनेचे नेते असून ते इतर पक्षांना नाही तर केवळ शिवसैनिकांनाच सल्ला देतील. त्यांचा सल्ला ऐकून जर इतर पक्षांचे नेते काम करायला लागले तर आम्हाला चांगलेच वाटेल. अंबादास दानवे म्हणाले की, विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी संख्याबळ कमी असले तरीही महाविकास आघाडी लोकशाहीच्या रक्षणासाठी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर बोलताना दानवे म्हणाले, आमचे संख्याबळ 14 ते 15 आमदारांचेच आहे, म्हणजेच ते खूप कमी आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मात्र, केवळ संख्याबळ कमी आहे म्हणून निवडणूक लढवायची नाही, असे होत नाही. लोकशाहीत प्रत्येक लढत महत्त्वाची असते. वन खात्याच्या जमीनीकडे दुर्लक्ष अंबादास दानवे म्हणाले की, वन विभागाच्या जमीनीकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे. ही जमीन विकासकाच्या हवाली कशी केली या संदर्भात सरकारने पावले उचलावी या दृष्टीने आम्ही विरोधक म्हणून सूचना केली आहे. जर सरकारने असे केले नाही तर सरकारच्या यामध्ये सहभाग आहे असे जनतेला वाटेल.
Source link
शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे:ते काँग्रेस किंवा भाजपसोबत जातील असं वाटत नाही- अंबादास दानवे