विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उपसभापती
.
काय म्हणाले केशव उपाध्ये.. “देवेंद्रजींचं स्थैर्य मोजता मोजता… वरळीत स्वतःचाच पाया निघाला… उद्धव ठाकरे आणि संजय राऊत रोज देवेंद्रजींच्या स्थैर्यावर बोलत राहिले… तोवर वरळीतूनच त्यांच्या उरल्या-सुरल्या राजकीय इमारतीला तडा गेला. सचिन अहिर यांच्या उपसभापतीपदाच्या अर्जाने एकच संदेश दिला, दुसऱ्यांच्या राजकारणाचा हिशोब मांडताना, स्वतःच्या पक्षाचा हिशोब चुकला!”

महायुतीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे, हा अर्ज भरताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मनिषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे यांसारखे महायुतीचे बडे नेते उपस्थित होते. या शक्तीप्रदर्शनातून महायुतीने विरोधकांना मोठा संदेश दिला आहे.
आदित्य ठाकरेंना ‘वरळीत’ सर्वात मोठा फटका! सचिन अहिर यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे आदित्य ठाकरे यांना त्यांच्याच हक्काच्या वरळी मतदारसंघात सर्वात मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात सचिन अहिर यांची स्वतःची तगडी वैयक्तिक ताकद आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. वरळी मतदारसंघात विधान परिषदेचे दोन आमदार होते, त्यापैकी अहिर यांनी आता शिंदेंची साथ धरल्याने ठाकरेंच्या उरल्या-सुरल्या राजकीय इमारतीला वरळीत खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संबंधित बातमी वाचा..
‘ऑपरेशन टायगर 3.0’ सुरू:3 नावं चर्चेत ठेवून शिंदेंनी फोडला ठाकरेंचा विश्वासू मोहरा; सचिन अहिर शिंदे गटात, जाणून घ्या इनसाइड स्टोरी

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटाचे (UBT) 6 खासदार फोडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपला मोर्चा आमदारांकडे वळवला आहे. शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर 3.0’ची सुरुवात झाली असून, विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिंदेंनी ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी आज अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, चंद्रकांत पाटील आणि नीलम गोऱ्हे उपस्थित होते. या एका घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, हे नेमके कसे घडले? याचीच चर्चा सगळीकडे सुरू आहे. सविस्तर वाचा
ठाकरे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका:आमदार सचिन अहिर यांना शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी

विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होते. सविस्तर वाचा