Headlines

Sachin Ahir Joins Shinde Faction; Thackerays Trust Broken


महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटाचे (UBT) 6 खासदार फोडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपला मोर्चा आमदारांकडे वळवला आहे. शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर 3.0’ची सुरुवात झाली असून, विधान परिषदेच्या उपसभापती पद

.

शिंदेंचे ‘धक्कातंत्र’ अन् 3 नावांची गुगली

एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची आणि उमेदवारीची बाब अत्यंत गुप्त ठेवली होती. यासाठी त्यांनी राजकीय वर्तुळात पद्धतशीरपणे ‘धक्कातंत्र’ वापरले. कालपासून शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी 3 नावे जाणीवपूर्वक चर्चेत ठेवली होती— नीलम गोऱ्हे, चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने. यातही उत्तर महाराष्ट्रातील 9 आमदारांनी (सत्यजीत तांबे, किशोर पाटील, आमशा पाडवी इ.) एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून चंद्रकांत रघुवंशी यांना उपसभापती करण्याची मागणी केली होती. यामुळे सर्वांचे लक्ष या तीन नावांवर केंद्रित झाले होते. मात्र, ऐन वेळी सचिन अहिर यांना सोबत घेऊन शिंदेंनी थेट त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ठाकरेंना गाफील ठेवून सर्वात मोठा ‘चेकमेट’ दिला.

8 दिवसांपूर्वीची ‘हिंट’ आणि ‘ऑपरेशन टायगर 3.0’

आठ दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंट दिली होती की, “थोडं थांबा, लवकरच मोठी ब्रेकिंग न्यूज मिळेल.” कालपर्यंत या विधानाचा अर्थ कोणालाच समजला नव्हता. मात्र, आजच्या घडामोडींनंतर शिंदे यांचे टार्गेट स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी दावा केला आहे की, “ठाकरे गटाचे आणखी 13 ते 14 आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच ते प्रवेश करतील. ठाकरेंना हा छोटा धक्का आहे, लवकरच याहून मोठा धक्का बसेल.”

‘क्रमवार यादी तयार आहे’ : संजय शिरसाट

आता आणखी कोणते आमदार शिंदे गटात येणार, असा प्रश्न मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक इशारा देत म्हटले,

QuoteImage

“क्रमवार यादी तयार आहे. त्यातील कुणाला कधी घ्यायचे, याचा निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे घेतील.”

QuoteImage

या विधानामुळे ठाकरे गटातील आणखी काही आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

‘ऑपरेशन टायगर’ अजून संपलेले नाही?

सहा खासदारांनंतर आता सचिन अहिर यांच्या प्रवेशामुळे ‘ऑपरेशन टायगर’चा पुढचा टप्पा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाकडून यापूर्वीच ठाकरे गटातील अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली?

राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2019 मध्ये शिवसेनेत आलेले सचिन अहिर हे अचानक शिंदे गटात का गेले? याची खालील प्रमुख कारणे चर्चेत आहेत.

  • विधान परिषदेचे गणित: सचिन अहिर यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे. मात्र, सध्याचे ठाकरे गटाचे विधानसभेतील घटलेले संख्याबळ पाहता, भविष्यात त्यांना पुन्हा विधान परिषदेवर निवडून जाणे कठीण होते.
  • विधानसभेचे दरवाजे बंद: सचिन अहिर यांचा बालेकिल्ला ‘वरळी’ विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र, तेथून स्वतः आदित्य ठाकरे निवडणूक लढवतात. त्यामुळे अहिर यांच्यासाठी विधानसभेचे दरवाजेही बंद झाले होते.
  • उपसभापती पदाची थेट ऑफर: राजकीय पुनर्वसनासाठी शिंदे गटाकडून त्यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची ऑफर देण्यात आली, जी त्यांनी स्वीकारली.
  • संजय दिना पाटील यांचा प्रभाव: काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पाटील हे अहिर यांचे अत्यंत जवळचे मित्र मानले जातात. त्यांच्या प्रवेशानंतरच अहिर यांनीही निर्णय पक्का केला असावा.

आदित्य ठाकरेंना हा धक्का का मोठा?

सचिन अहिर यांचे जाणे हा केवळ आकड्यांचा खेळ नसून शिवसेनेच्या मुंबईतील (विशेषतः दक्षिण-मध्य मुंबईतील) ताकदीला बसलेला मोठा धक्का आहे. 1999, 2004 आणि 2009 असे तीन वेळा ते वरळीतून आमदार होते. ते राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री आहेत. 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी सचिन अहिर यांनी आपला वरळी मतदारसंघ सोडला होता. वरळीत ग्राउंड लेव्हलवर कार्यकर्त्यांची फळी आणि कामगार संघटनांवर (राष्ट्रीय मिल मजदूर संघ) अहिर यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या जाण्याने आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात.

कायदेशीर पेच आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया

ठाकरे गटाच्या आमदाराने शिंदे गटाकडून अर्ज भरल्याने कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो, यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “सर्व कायदेशीर बाबी तपासूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. सचिन भाऊंसारखा अनुभवी नेता आमच्यासोबत आल्याचा आनंद आहे.”

तर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले, “जे येतायत त्यांची मानसिकता तिकडे ढासळली आहे. आम्हाला वेगळे ऑपरेशन करायची गरज नाही. सचिन अहिर हे मूळचे शिवसैनिकच आहेत आणि त्यांनी शिवसैनिकांच्याच भावनेतून हा निर्णय घेतला आहे.” भाजप नेते प्रसाद लाड यांनीही शिंदेंच्या या ‘धक्कातंत्राचे’ स्वागत केले आहे.

विधान परिषदेत आता ठाकरे गटाचे कोण उरले?

सचिन अहिर यांच्या एक्झिटनंतर आता विधान परिषदेत ठाकरे गटाकडे केवळ ५ आमदार उरले आहेत:

  1. सुनील शिंदे
  2. ज. मो. अभ्यंकर
  3. अनिल परब
  4. अंबादास दानवे
  5. मिलिंद नार्वेकर

शिवसेना ठाकरेंच्या पक्षातील विधानसभा आमदारांची यादी

1. गुहागर – भास्कर जाधव 2. बार्शी – दिलीप सोपल 3. उस्मानाबाद – कैलास पाटील 4. उमरगा – प्रवीण स्वामी 5. खेड आळंदी – बाबाजी काळे 6. भायखळा – मनोज जामसूतकर 7. शिवडी – अजय चौधरी 8. वरळी – आदित्य ठाकरे 9. माहीम – महेश सावंत 10. वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई 11. मेहकर- सिद्धार्थ खरात 12. दर्यापूर – गजानन लवाटे 13. बाळापूर – नितीन देशमुख 14. वणी – संजय देरकर 15. परभणी – राहुल पाटील 16. विक्रोळी – सुनील राऊत 17. जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर 18. दिंडोशी – सुनील प्रभू 19. वर्सोवा – हरुन खान 20. कलिना – संजय पोतनीस

एकूणच, लोकसभा निवडणुकीतील यशानंतर सावरत असलेल्या उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर 3.0’ च्या माध्यमातून मुंबईच्या बालेकिल्ल्यातच अत्यंत वर्मी घाव घातला आहे.

संबंधित बातमी वाचा…

ठाकरे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका:आमदार सचिन अहिर यांना शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी

विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होते.

सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आदित्य ठाकरे यांना सर्वांत मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात विधान परिषदेचे दोन आमदार होते. वरळी विधानसभा मतदासंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.