Headlines

Hingoli Tree Plantation Launch On Vat Purnima; 25.40 Lakh Target



राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्ह्याला यावर्षी पावसाळ्यात 25 लाख 40 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टपूर्तीसाठी विभागवार नियोजन पूर्ण केले असून वटपोर्णिमेच्या मुहुर्तावर जिल्हा परिषदेन

.

राज्य शासनाने 2026 ते 2031 या पाच वर्षांत 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्याला 25.40 लाखांचे लक्ष्य मिळाले आहे. पर्यावरण संतुलन, भूजल पातळी वाढ व ग्रामीण भागात रोजगार निर्मिती हे या मोहिमेचे मुख्य उद्देश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व विभागांना रोप लागवडीचे लक्ष्य वाटप करण्यात आले.

जिल्हाभरात शासकीय कार्यालयाच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाची पुढील 5 वर्षे देखभाल करणे बंधनकारक आहे. जिओ-टॅगिंगद्वारे प्रत्येक रोपाची नोंद ठेवली जाणार असून, रोपे जिवंत आहेत की नाही याची ठरावीक कालावधीनंतर तपासणी केली जाईल. वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, करंज, कडुनिंब, आवळा अशा स्थानिक प्रजातींच्या रोपांना प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, शेतकरी, महिला बचत गट, युवा मंडळे व सामाजिक संस्थांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

रोपवाटिकांमध्ये पुरेशी रोपे उपलब्ध करून देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिंगोली जिल्हा परिषदेने वृक्षलागवड मोहिमेला सोमवारपासून ता. 29 सुरवात केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे, कर्मचारी शेख युसुफ यांची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *