Headlines

भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा:समाधान महाराज शर्मा यांचे प्रतिपादन, गंगापूर येथील श्रीराम कथा‎




प्रतिनिधी | गंगापूर देवाने सर्व दु:खे द्यावीक, परंतु दरिद्रीसारखं दु:ख कोणाला देऊ नये. भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी केले. सत्संगाच्या माध्यमातून भाविकांमध्ये आत्मसाक्षात्कार, ईश्वरभक्ती आणी जीवनात सुधारणा घडवून आणणे या उद्देशासाठी रामकथेचे आयोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने भाविकांनी कथेचे स्रवण करावे, असे मतही समाधान महाराज शर्मा यांनी केले. गंगापूर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू झालेल्या श्रीराम कथेच्या पहिल्या दिवसाचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. या वेळी आयोजक, नगराध्यक्ष व आयोजक संजय जाधव, जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णाताई जाधव, उपाध्यक्ष अमोल जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महाराजांनी रामकथेचे महत्त्व, भक्तीचे महत्त्व आणि रामायणाची प्रासंगिकता यावर प्रकाश टाकून रामकथेचा उद्देश केवळ मनोरंजन नसून रामचरितमानसाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करून जीवनातील समस्यांवर उपाय शोधणे हा असल्याचे सांगितले. कथेची सुरुवात नगराध्यक्ष संजय जाधव व सुवर्णाताई जाधव यांच्या हस्ते कथापूजनाने झाली. या वेळी नगरसेवक संतोष अंबिलवादे, कृष्णा पाटील, नवनाथ कानडे, योगेश पाटील, गोपाळ राऊत, रामेश्वर नावंदर, सोपान देशमुख, अप्पासाहेब हिवाळे, तुकाराम सटाले यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सर्वपक्षीय पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम कथेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्रशालेचे मैदान भाविकांनी तुडुंब भरले होते. कथेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान, श्रीराम कथेच्या पहिल्याच दिवशी भाविक मोठ्या प्रमाणात आले होते. शेकडो भाविकांना केले महाप्रसादाचे वाटप श्रीराम कथेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्रशालेचे मैदान भाविकांनी तुडुंब भरले होते. कथेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *