Headlines

शासकीय सेवेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आपुलकीने सन्मान:महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त प्रबोधन विद्यालयामध्ये आयोजन; मान्यवरांकडून विशेष मार्गदर्शन‎




प्रतिनिधी | दर्यापूर सामाजिक क्रांतीचे अग्रदूत,स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष धर्माधिकारी,धनंजय गणोरकर, एस.के.देशमुख, किशोर गणोरकर,डॉ.दिलीप देशमुख, गजानन सरदार, विश्वस्त व सदस्य कार्यकारिणी मंडळ तसेच पर्यवेक्षक राजकुमार बावनकुळे, ज्येष्ठ शिक्षक अरविंद हाडोळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. महात्मा फुले यांनी फक्त आपल्या विचारसरणीतून नव्हे तर कर्तृत्वाने कर्मठ व जाचक व्यवस्थेविरुद्ध लढा देत समानतेची व्यवस्था निर्माण केल्याचे मत विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र गोंडाणे यांनी प्रास्ताविक करताना व्यक्त केले.दरम्यान विविध शासकीय विभागांमध्ये नुकतेच रुजू झालेल्या अनेक माजी विद्यार्थ्यां शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शासकीय सेवा समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ प्रबोधन मंडळ कार्यकारिणी अध्यक्ष अॅड. संतोष धर्माधिकारी यांनी केले. विद्यालयाचे असंख्य विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत असून येणाऱ्या काळामध्ये विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्याचे नियोजित असून त्यासाठी शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन याप्रसंगी प्राचार्य नरेंद्र गोंडाने यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.निखिल बुंदेले तर आभार प्रदर्शन मनोज इंदोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली. यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांशी भेट हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश माजी विद्यार्थ्यांची भेट घेणे, चर्चा करून विद्यार्थ्यांना त्यापासून प्रेरणा देणे हा होता. महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत असल्याचा अभिमान ठेवत, त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांमध्येही महाविद्यालयाबद्दल आपुलकी निर्माण झाली. तसेच महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन मिळावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा, हा देखील मानस होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *