![]()
शेतीच्या सातबारा उताऱ्यावर झालेला चुकीचा फेर रद्द करण्याच्या मागणीसाठी ढोरकीन येथील महिला शेतकरी शोभा बबन कुदळे यांनी शुक्रवारी दुपारी पैठण तहसील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिस आणि महसूल प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करत मध्यस्थी
.
शोभा कुदळे यांच्या शेतीच्या सातबारा उताऱ्यावर चुकीच्या व्यक्तीच्या नावाची नोंद झाल्याचा त्यांचा आरोप आहे. महिनाभरापूर्वी देखील त्यांनी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन; आंदोलन मागे : माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी गायकवाड, लक्ष्मण पुरी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काही तास संयमाने कुदळे यांचे समुपदेशन केले. त्यांची समजूत काढून त्यांना खाली उतरवण्यात यश आले. नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांनी संबंधित प्रकरणावर कायदेशीर पडताळणी करून तातडीने पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले.