![]()
वनमहोत्सव सप्ताहानिमित्त निफाड नगरपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे बीजगोळे (सिडबॉल) तयार करण्याचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. मुख्याधिकारी धिरज भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.शहरात अधिकाधिक वृक्षलागवड व्हावी, पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माझी वसुंधरा अभियान तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका अरुणा महाजन, शिक्षक धर्मेंद्र सोनवणे, मनीषा कर्डिले आणि सुरेखा खैरनार उपस्थित होते. प्रतिनिधी | सिन्नर वनमहोत्सव सप्ताहानिमित्त येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘वृक्षमित्र प्रतिज्ञा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निसर्ग संवर्धनासाठी सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमांतर्गत नवीन वृक्षारोपण करणे, लावलेल्या वृक्षांचे शास्त्रशुद्ध संगोपन करणे, पाणी व नैसर्गिक संसाधनांची बचत करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच शालेय परिसर स्वच्छ, सुंदर व हिरवागार ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व, जैवविविधतेचे संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक रामनाथ रायते यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसरात किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरणाबाबत जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका मंगला हांडे, पर्यवेक्षक पांडुरंग करपे व विजयानंद कुमावत, हरित सेनेचे प्रमुख प्रीती पवार, विकास बैरागी आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी | चांदवड वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. वडाचा वृक्ष पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा असून तो मोठ्या प्रमाणात प्राणवायू देत जैवविविधतेचे संरक्षण करतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य संघटक बी. एल. शिंदे यांनी केले. धोडंबे येथील क. का. वाघ हायस्कूलमध्ये महाराष्ट्र कृषी दिन, वनमहोत्सव आणि पर्यावरण जनजागृती अभियानांतर्गत वृक्षारोपण व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यात किमान एक वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. जलसंधारण, जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणात युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत आजची वृक्षलागवड ही भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Source link
सिन्नरच्या लोकनेते वाजे विद्यालयात वृक्षलागवडीसह संवर्धनाचा संकल्प:विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घेतली ‘वृक्षमित्र’ प्रतिज्ञा