Headlines

किड्स पॅराडाईजमध्ये अवतरली ‘ज्ञानाची पालखी’‎:महापुरुषांना वंदन, पुस्तकांचे पूजन अन् संस्कारमय उपक्रमाचे शैक्षणिक वर्षाची सुरुवात‎




पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ चा प्रारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात आला. शाळेत विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यपुस्तके, भारतीय संविधान, ग्रामगीता, तुकाराम गाथा आदी ज्ञानग्रंथांचे पूजन करून त्यांची पालखी काढली. उत्साहपूर्ण वातावरणात काढलेल्या ‘ज्ञान दिंडी’ने परिसर संस्कारमय झाला. यावेळी या ज्ञानाच्या पालखीचे पूजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका ज्योत्स्ना गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर संत व थोर महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन विद्यार्थी उभे होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने या महापुरुषांना वंदन करून त्यांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचा व ज्ञानार्जनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प केला. हा अभिनव प्रवेशोत्सव शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. यशस्वितेसाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नितू ढोणे, नरेंद्र बोरकर, प्रियंका चव्हाण, बजरंग भुजबटराव, स्वप्निल पाटील, अविनाश पाटील, शुभांगी बोरकर, प्रतीक्षा भारसाकळे, स्मितल उगले, वैशाली इंगळे, अक्षय तायडे, सदानंद कातखेडे, हरिश सौंदळे, राजश्री खंडारे, तेजस्विनी गवई, समीक्षा डोंगे यांच्यासह कल्पना वानेरे, रोशनी नकाशे, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *