Headlines

नाना पटोलेंचा भाजप- RSS वर गंभीर आरोप:म्हणाले- राम मंदिराच्या देणग्या लुटल्या, यात मोदींपासून भागवतांपर्यंत सगळेच सामील; प्रभू श्रीराम यांना सोडणार नाहीत




अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, काँग्रेसन नेते नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्वच जण सामील असल्याचा दावा पटोले यांनी नागपुरात बोलताना केला. तसेच, केवळ अयोध्येतच नाही, तर पंढरपूर आणि सिद्धिविनायक मंदिराच्या देणग्यांमध्येही लूट झाल्याचे ते म्हणाले. ‘भावनांशी खेळणे हाच भाजप-RSS चा हेतू’ राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर बोलताना नाना पटोले यांनी थेट भाजप आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “या घोटाळ्याला थेट RSS जबाबदार आहे. मोहन भागवतांपासून ते नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भाजप यात सामील आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. देणगीचे पैसे लुटणे आणि लोकांच्या भावनांशी खेळणे हाच भाजप आणि आरएसएसचा मूळ हेतू आहे. त्यामुळे या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी देशातील जनतेची आणि सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे, पण ते तसे करणार नाहीत.” ‘SIT म्हणजे केवळ सत्य लपवण्याची यंत्रणा’ या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकावर (SIT) अविश्वास दाखवत पटोले यांनी सरकारवर कडाडून टीका केली. “SIT ही केवळ सर्व सत्य लपवण्यासाठी बनवलेली त्यांचीच एक सिस्टीम आहे. यातून ते कोणालातरी ‘बळीचा बकरा’ बनवतील आणि मुख्य सूत्रधार मात्र यातून सहीसलामत बाहेर राहतील. त्यामुळे सनातन भावनांशी खेळणाऱ्या भाजप आणि आरएसएसवर थेट कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. ‘पंढरपूर, सिद्धिविनायकातही लूट; प्रभू राम यांना सोडणार नाहीत’ बद्रीनाथ-केदारनाथ धाममधील देणग्या आणि प्रसादातील कथित गैरव्यवहाराबाबत विचारले असता, नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील मंदिरांचाही दाखला दिला. “हे केवळ बद्रीनाथमध्येच घडले नाही, तर महाराष्ट्रातील सिद्धिविनायक आणि पंढरपूरमध्येही हेच झाले आहे. या सर्व ठिकाणी त्यांनी देणगीचे पैसे लुटले आहेत. पण प्रभू श्रीराम यांना अजिबात सोडणार नाहीत, देव त्यांना त्यांची योग्य जागा नक्की दाखवून देईल,” असा घणाघात नाना पटोले यांनी केला. अयोध्या राम मंदिर: राम मंदिर देणगी चोरी वेदनादायी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी- संघ, संभ्रम संपवून व्यवस्था सुरळीत करण्याचे आवाहन श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले, श्रीराम जन्मभूमी मंदिर हे पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आणि कोट्यवधी रामभक्तांचे समर्पण आणि बलिदानाचे प्रतीक आहे, परंतु दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या रकमेच्या चोरीच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण समाज आणि कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेला मोठा धक्का पोहोचवला आहे. सविस्तर वाचा भीषण अपघात: जालन्यात 2 बसची टक्कर; 25 शाळकरी मुलांसह 30 जखमी, दोन्ही चालक गंभीर, शहापूरजवळील गल्हाटी नदी पुलावरची घटना जालना-वडीगोद्री महामार्गावर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातात ‘मानव विकास मिशन’च्या बसमधून प्रवास करणाऱ्या २५ शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे ३० प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *