Headlines

दगडूशेठ गणपतीसाठी मोफत इलेक्ट्रिक वाहन सेवा सुरू:'एका मोबिलिटी'चा पुढाकार, शनिवारवाडा ते मंदिर मार्गासाठी ट्रस्टला दिले वाहन




पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला ‘एका मोबिलिटी’ कंपनीकडून एक पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले आहे. गणेशभक्तांना शनिवारवाडा ते दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर मोफत आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी, हा यामागील उद्देश आहे. हे इलेक्ट्रिक वाहन ‘एका मोबिलिटी’चे सुधीर मेहता यांच्या कंपनीने ट्रस्टला सुपूर्द केले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी हे वाहन स्वीकारले. यावेळी ‘एका मोबिलिटी’च्या सुनंदा मेहता आणि अरिहंत मेहता उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात, या वाहनाचा वापर शनिवारवाडा ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या मार्गावर मोफत प्रवासासाठी केला जाईल. भविष्यात, पुणे रेल्वे स्थानक आणि एसटी स्थानकासारख्या ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचवण्यासाठीही ही सेवा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, हे वाहन गणेशभक्तांसाठी अत्यंत आरामदायक आणि पर्यावरणपूरक आहे. तसेच, त्याच्या वापराचा खर्चही कमी आहे. प्रति किलोमीटर सुमारे ५० पैसे इतका खर्च येत असल्याने ही सेवा अधिक प्रभावीपणे चालवता येईल. ‘एका मोबिलिटी’चे अरिहंत मेहता म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टसोबत जोडले गेल्याचा आम्हाला आनंद आहे. गणेशभक्तांसाठी ही मोफत सेवा सुरू करताना समाधान वाटत आहे. सध्या शनिवारवाडा ते मंदिर मार्गावर ही सेवा सुरू झाली असून, भविष्यात ट्रस्टच्या सहकार्याने ती अधिक व्यापक करण्याचा आणि जास्तीत जास्त भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *