Headlines

‘हर हर महादेव’च्या गजरात कळमनुरी ते हिंगोली कावड यात्रा:हजारो भाविकांचा सहभाग, आमदार संतोष बांगरांचा पुढाकार




हर हर महादेवच्या गजरात कळमनुरी येथून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी ता. २४ कावड यात्रा काढण्यात आली. आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारात काढण्यात आलेल्या कावड यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करून नाश्‍ता, चहापाणी, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा काढली जाते. मागील १५ वर्षापासून हि कावड यात्रा काढली जाते. त्यानुसार यावर्षीही कावड यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती. आज दुपारी साडेबारा वाजता कळमनुरी येथील चिंचाळेश्‍वर महादेव मंदिरात आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते पुजा करून कावड यात्रेेला सुरवात झाली. यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, नगरसेवक गुड्डू बांगर, गणेश बांगर, कळमनुरीचे उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, आर. आर. पाटील, माजी नगराध्यक्ष उत्तम शिंदे, नगरसेवक कैलास पारवे, माजी सभापती संजय बोंढारे, विजय बोंढारे, दत्ता माने, धनंजय पाटील दातीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, दुपारी एक वाजता कावड कळमनुरी येथून हिंगोलीकडे निघाली. या कावडयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले. हर हर महादेव, बम बम भोले च्या गजरामध्ये निघालेल्या कावड यात्रेचे रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आहे. या यात्रेमध्ये तरुणांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. सुमारे १८ किलो मिटर अंतराच्या मार्गावर यात्रेतील भाविकांना चहा, पाणी, नाश्‍ता, भोजन वाटप करण्यात येत आहे. या कावड यात्रेमुळे या मार्गावरील वातावरण धार्मिक बनले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *