![]()
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाल
.
एकापाठोपाठ एक नेते पक्षाची साथ सोडत असल्याने ठाकरे गटाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीत धोरणात्मक मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये उर्वरित आमदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि त्यांनी पक्ष सोडू नये, यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील रणनीती आणि आमदारांच्या सभागृहातील कामगिरीचा आढावा यावर चर्चा होईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ध्येयधोरणे आणि डॅमेज कंट्रोलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
ठाकरेंचे उरलेले शिलेदारही शिंदेंच्या रडारवर
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या ९ पैकी ६ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवत उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. खासदार फुटीच्या या मोठ्या धक्क्यानंतर, आता शिंदे गटाने ठाकरे गटाचे उर्वरित आमदार आणि नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राजकीय गणिते वेगाने बदलत असल्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे अत्यंत सावधगिरीने पावले उचलत आहेत.
संजय राऊतांचा २० कोटींच्या ‘ऑफर’चा गौप्यस्फोट
दरम्यान, ही धुसफूस केवळ ठाकरे गटापुरती मर्यादित नसून महाविकास आघाडीचे इतर आमदारही शिंदे गटाच्या रडारवर असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आरोप केला की, “महाविकास आघाडीतील काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदे गटाकडून तब्बल २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा आमदारकीचे तिकीट देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.”
राऊत यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली असून, एकनाथ शिंदे यांचा डोळा आता ठाकरेंच्या उरलेल्या आमदारांसह मविआच्या इतर नेत्यांवर आणि नगरसेवकांवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या ‘मातोश्री’वरील बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा…
राम मंदिरात दरोडा टाकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?:मंदिरातून लुटलेला पैसा सत्ताधाऱ्यांना अन् त्यांच्या मुलाबाळांना पचणार नाही- संजय राऊत
मतदारसंघांच्या पुनर्रचना विधेयकासाठी (डिलिमिटेशन बिल) आवश्यक असलेला बहुमताचा आकडा भाजप सरकार कितीही पक्ष आणि खासदार फोडले तरी गोळा करू शकत नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, अयोध्येतील राम मंदिराच्या नावावर भाजपच्याच लोकांनी मोठी लूट केली असून, या कथित घोटाळ्याविरोधात आजपासून शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा…
रामरक्षा’ नव्हे, आधी ‘पक्षरक्षा’ अन् ‘आमदाररक्षा’ आंदोलन करा:टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्याची गोष्ट उद्धव ठाकरेंनाच तंतोतंत लागू होते; भाजपचा राऊतांना टोला
उद्धव ठाकरे यांनी प्रथम आपल्या पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा म्हणत राऊत यांच्या ‘राम रक्षा आंदोलन’ महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या दाव्यावर बन यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राबाहेर विस्ताराच्या घोषणा करण्यापेक्षा पक्षातील संघटनात्मक आव्हानांवर लक्ष केंद्रित करावे. तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात घरातून कारभार केला आता प्रभू श्रीरामांच्या नावाचा वापर हा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केला जात आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…