Headlines

Nagpur Family 5 Missing; Mobile Not Reachable, Debt Suspected



नागपूरमधील अत्यंत उच्चभ्रू आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धंतोली येथून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. येथील एकाच कुटुंबातील तब्बल पाच सदस्य गेल्या १० दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. २४ जूनपासून हे सर्व जण गायब अस

.

धंतोली पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार हर्षा परसवानी (वय ५७ वर्षे), जितेंद्र परसवानी (वय ४२ वर्षे), इशिता परसवानी (वय ४० वर्षे), खुशी परसवानी (वय २१ वर्षे), कृष्णा परसवानी (वय १२ वर्षे) अशी बेपत्ता झालेल्या सदस्यांची नावे आहेत.

नातेवाईकांची शोधाशोध अपयशी

मिळालेल्या माहितीनुसार, धंतोली परिसरात ७१ वर्षीय तक्रारदार श्यामसुंदर परसवानी यांचे कुटुंब राहते. याच ठिकाणी त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील सदस्यही वास्तव्यास आहेत. २४ जून रोजी सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील वरील पाचही सदस्य कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले.

कुटुंब अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी तात्काळ त्यांच्या सर्व ओळखीच्या व्यक्तींकडे, मित्रपरिवाराकडे आणि इतर ठिकाणी कसून शोधाशोध केली. मात्र, सर्वांचे फोन बंद असल्याने आणि कुठेही माग लागत नसल्याने नातेवाईक प्रचंड घाबरले. अखेर श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलिस ठाण्यात धाव घेत सर्व जण बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार नोंदवली.

शेवटचे लोकेशन पुण्याचे

धंतोली पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलच्या मदतीने बेपत्ता सदस्यांच्या मोबाईल क्रमांकांचा माग काढला असता, पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचा सुगावा लागला आहे. या पाचही जणांचे ‘शेवटचे लोकेशन’ पुणे येथे दाखवत असल्याचे समोर आले आहे. या माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांचे एक पथक तपासासाठी रवाना होण्याची शक्यता असून, पुणे पोलिसांचीही मदत घेतली जात आहे.

आर्थिक विवंचनेतून पाऊल उचलल्याचा संशय

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील एका सदस्यावर मोठ्या प्रमाणावर कर्जाचा डोंगर होता. याच आर्थिक विवंचनेतून आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने अचानक घर सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा…

भंडारा पोलिसांची मोठी कारवाई:3 जिल्ह्यांत गोवंश तस्करी करणाऱ्या कुख्यात ‘सम्राट टोळी’वर ‘मकोका’चा दणका

कत्तलीसाठी गोवंश जनावरांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या आणि भंडारा, गोंदिया तसेच नागपूर जिल्ह्यांत गुन्हेगारी कारवायांद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात ‘सम्राट टोळी’विरुद्ध अखेर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी 3 जुलै रोजी या टोळीविरुद्ध मकोका कायद्याचे कलम वाढवण्याचे आदेश दिले. टोळीप्रमुख सम्राट कांतीलाल येवले (वय 33, रा. गोरेगाव) आणि त्याचे साथीदार यांच्यावर हा कायदेशीर फास आवळण्यात आला असून, यामुळे आंतरजिल्हा गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत. सविस्तर वाचा…

छत्तीसगडचे हत्ती गडचिरोलीमध्येच स्थिरावले:संख्या 23 वरून 32 वर, सुरक्षेसाठी वन विभागाची हायटेक यंत्रणा सक्रिय

गडचिरोलीच्या जंगलात लोकांना आता एका नव्या थराराचा अनुभव घेता येणार आहे. कमलापूर हत्ती कॅम्पमधील पाळीव हत्तींनंतर आता छत्तीसगडमधून आलेल्या रानटी हत्तींचा मुक्त वावर लोकांना ते जाता -येताना पाहता येणार आहे. मात्र, त्यासाठी कमालीची सावधगिरी बाळगावी लागणार आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये आलेल्या 23 वन्य हत्तींच्या कळपात नव्या पिल्लांचा जन्म झाल्याने ही संख्या आता 32 वर पोहोचली असून यात 21 मादी, 9 पिल्ले आणि 2 टस्कर (नर) हत्तींचा समावेश आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.