Headlines

आषाढी वारी:मुर्डेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचे खामगावात उत्साहात स्वागत




आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुर्डेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे खामगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. कन्हैया ड्रेसेसचे कृष्णा सोनवणे यांच्या निवासस्थानी दिंडी प्रमुख बालयोगी विद्यानंद महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुर्डेश्वर येथून निघणाऱ्या या मानाच्या पायी दिंडीचे हे चौदावे वर्ष आहे. या दिंडीबाबत माहिती देताना मुर्डेश्वर संस्थानाचे पीठाधीश बालयोगी श्री विद्यानंद महाराज यांनी सांगितले की, वारीमध्ये लहान-थोरांसह १ हजारांहून अधिक महिला व पुरुष वारकरी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशीवृंदावन आणि खांद्यावर भगवी पताका घेऊन ‘ज्ञानबा-तुकाराम’ च्या गजरात वारकरी पंढरीकडे मार्गस्थ झाले आहेत. मार्गात ठिकठिकाणी अन्नदाते व गावकऱ्यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी फराळ, भोजन व मुक्कामाची व्यवस्था केली आहे. दिंडीला निरोप देण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. महिलांनी वारकऱ्यांचे औक्षण करून सुखरूप वारीसाठी प्रार्थना केली. यावेळी सोसायटीचे बाबासाहेब सोनवणे, कृष्णा सोनवणे, हरिदास सोनवणे, डिगा, वसंत जोगदंडे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *