![]()
शहरातील बिअर बार रात्री दीड वाजता बंद होण्याचा नियम असला तरी अनेक बार शटर डाऊन करून पहाटेपर्यंत सुरू असायचे. रात्रभर चालणाऱ्या या धिंगाण्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली होती. अलीकडेच जालना रोडवरील एका व्यावसायिकाची हत्या आणि सिडको एन-७ मधील सुरभी बार बाहेर पहाटे ४ वाजता दोन गटांत झालेला राड्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अधिसूचना जारी करून सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल करून कारवाई
हा कायदा जर कुणी मोडला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कृत्यानुरूप कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. – प्रवीण पवार, पोलिस आयुक्त. छत्रपती संभाजीनगर.
Source link
पब, बार रात्री 1.30 वाजता सक्तीने बंद:नियमांचे उल्लंघन केल्यास आता थेट गुन्हा, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांची नियमावली