Headlines

विवाहित असल्याचे माहीत असूनही संबंध ठेवले तर तो बलात्कार कसा?:ठाणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, आरोपीची निर्दोष मुक्तता




लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका ३० वर्षीय तरुणाची ठाणे न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. जानेवारी २०२२ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेची आणि या तरुणाची मैत्री झाली होती. एप्रिल २०२२ मध्ये लग्नाचे आश्वासन देऊन त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा महिलेचा आरोप होता. काही काळानंतर तरुणाने आपण आधीच विवाहित असल्याचे सांगितले, परंतु पुन्हा लग्न करू शकतो असे आश्वासन दिले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि महिलेने ३ जून २०२३ रोजी मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता न्यायालयाने या प्रकरणात तरुणाची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात सरकारी बाजू आणि बचाव पक्ष या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद निर्णायक ठरले. महिलेने यापूर्वी खटला मागे घेण्याची इच्छा व्यक्त करणारे पुरवणी विधान सादर केले. मारहाणीच्या आरोपांना कोणताही वैद्यकीय पुरावा नव्हता. दावा ठरतो कमकुवत जेव्हा एखाद्या प्रकरणात पीडितेला आरोपीच्या वैवाहिक स्थितीची पूर्वकल्पना असते आणि त्यानंतरही ती स्वतःच्या मर्जीने शारीरिक संबंध ठेवते तेव्हा भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत “संमतीविना संबंध किंवा लग्नाच्या आमिषाने बलात्कार’ हा दावा कायदेशीरदृष्ट्या कमकुवत ठरतो. तरीही संबंध ठेवले सत्र न्यायाधीश जी. टी. पवार यांनी १ जुलै रोजी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले की, आरोपी आणि पीडित महिला यांच्यातील संबंध वर्षभरापेक्षा जास्त काळ सुरू होते. आरोपी विवाहित असल्याचे समजल्यानंतर तिने त्याच्याशी भांडण केले, पण तरीही तिने शारीरिक संबंध ठेवले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *