Headlines

पिळकोसच्या उपसरपंचपदी शोभा वाघ यांची अविरोध निवड:संभाव्य तणावाची शक्यता टळली; गावात जल्लोष‎




तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभा वाघ यांची अविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार उपसरपंच मधुकर जाधव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंचपदासाठी दोन सदस्य इच्छुक असल्याने दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतले होते. त्यामुळे काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भाऊसाहेब जाधव, मधुकर जाधव, मोहन वाघ आणि उत्तम मोरे यांनी दोन्ही इच्छुक सदस्य व त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून समन्वय साधला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना यश आले. यानंतर उपसरपंचपदासाठी शोभा वाघ यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच उज्वला पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी संजय महाले, ग्रामपंचायत अधिकारी नितीन बच्छाव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गावात सकाळपासून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कळवण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रामदास गवळी, निलेश शेवाळे, संदीप गांगुर्डे आणि पंकज शेवाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *