![]()
दौलताबाद येथील नंदीबेड धबधबा परिसरात मृतदेह आढळला. पोलिसांच्या पथकाने स्ट्रेचरवरून मृतदेह आणला.
“मित्रांसोबत धबधब्यावर जाऊ नकोस,’ असा वडिलांनी काळजीपोटी दिलेला हा सल्ला न ऐकणे शहरातील रमानगर येथील एका १८ वर्षांच्या तरुणाच्या जिवावर बेतले. रविवारी (५ जुलै) सुटीच्या दिवशी मित्रांसोबत दौलताबाद परिसरातील केसापुरी तांडा येथील नंदीबेड धबधबा पाहण्यासा
.
प्रथमेश हा बारावीत शिकत होता. त्याचे वडील कांतीलाल गायकवाड एका कुरिअर कंपनीची रिक्षा चालवतात. रविवारी सुटी असल्याने प्रथमेशने मित्रांसोबत पैसे जमवून धबधबा पाहण्यासाठी जाण्याचा बेत आखला आणि वडिलांकडे पैशांची मागणी केली होती. वडिलांनी त्याला, “तू मित्रांसोबत जाऊ नकोस,’ असे सांगितले होते. मात्र, वडिलांचा हा सल्ला डावलून प्रथमेश मित्रांसोबत नंदीबेड धबधब्यावर गेला. दरम्यान, प्रथमेश याचा मृत्यू नेमका कसा झाला याचा उलगडा त्याच्या मित्रांचे जबाब नोंदवल्यावर होईल, अशी माहिती दौलताबाद पोलिसांनी दिली.
पोलिसांची २ किलोमीटर डोंगरातून पायपीट
सायंकाळी सहाच्या सुमारास माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. नंदीबेड धबधबा परिसर दुर्गम असल्याने तेथे वाहने जाणे शक्य नव्हते. उपनिरीक्षक अशोक सोनवणे, अंमलदार कपिल सातदिवे, रावसाहेब ढिल्लारे यांच्या पथकाने २ किलोमीटर पायपीट केली. त्यानंतर खांद्यावरून मृतदेह खाली आणला. या प्रकरणी दौलताबाद ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
‘स्टेटस’वरून समजले वृत्त
धबधबा परिसरात पोहोचल्यानंतर पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने प्रथमेशचा मृत्यू झाला. आपल्या डोळ्यांदेखत मित्र गेल्याने त्याचे मित्र प्रचंड घाबरले. त्यांनी प्रथमेशच्या कुटुंबाला माहिती देण्याऐवजी किंवा मदतीसाठी थांबण्याऐवजी तेथून पळ काढला. घरी परतल्यानंतर या मित्रांनी सोशल मीडियावर प्रथमेशच्या मृत्यूचे स्टेटस ठेवले. हे स्टेटस पाहून प्रथमेशच्या नातेवाइकांना धक्का बसला.
बातमीतून धडा
तरुणांनो सावधान : पावसाळ्यात धबधबे आणि डोंगराळ भागात पर्यटनाचा आनंद घेताना अति उत्साह जिवावर बेतू शकतो. पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने या दुर्घटना घडतात. तरुणांनी पालकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये आणि अनोळखी पाण्यात उतरण्याचा मोह टाळावा. तसेच संकटाच्या वेळी मित्राला एकटे सोडून पळ काढण्यापेक्षा वेळीच मदत मागितली तर कदाचित एखादा जीव वाचू शकतो.