Headlines

Devendra Fadnavis Speech in Assembly Over Pune Mumbai Rain Incidents


मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील वि

.

याचबरोबर “आज दुपारनंतर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केले आहे.

मुंबईत दोन दिवसांत १२ बळी; विरोधक आक्रमक

सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील गंभीर पूरपरिस्थिती आणि अपघातांवरून सरकारला घेरले. “मुंबईत मॅनहोलमध्ये पडून, झाडे कोसळून तसेच मानखुर्द येथील इमारत कोसळून गेल्या दोन दिवसांत १२ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले. सरकारने या संपूर्ण परिस्थितीवर तातडीने अधिकृत निवेदन द्यावे, तसेच या सर्व दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

मुंबईत दरवर्षी ८०० झाडे पडतात, काल एकाच दिवसात ३५० पडली

विरोधकांच्या मागण्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले. ते म्हणाले, “सध्या निसर्गाच्या माध्यमातून अत्यंत अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल ताशी ५० किमी वेगाने वारे वाहत होते. मुंबईत संपूर्ण पावसाळ्यात सरासरी ८०० झाडे पडतात, पण काल एकाच दिवसात ३५० झाडे कोसळली. आजचा दिवस त्याहूनही गंभीर आहे. दुपारनंतर वाऱ्याचा वेग ७० ते ९० किलोमीटर प्रतितास होणार असल्याने आम्ही सर्वांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची विनंती केली आहे.”

मानखुर्द दुर्घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, “ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती. ती शेजारील झोपडीवर कोसळल्याने लोक दगावले. आमचे मंत्री गिरीश महाजन रात्री १ वाजता स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. दुर्घटना टाळण्यासाठी आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत.”

मुंबई-पुणे मार्ग आणि ‘मिसिंग लिंक’वरील परिस्थिती

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील दरडींबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “आपली आपत्ती व्यवस्थापनाची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरून काम करत आहे. मिसिंग लिंकवर दरड कोसळताच आम्ही तात्काळ वाहतूक बंद करून ती सुरक्षित मार्गावर वळवली आहे. दोन्ही बाजूंच्या प्रवाशांना आधीच सूचना दिल्या गेल्याने तिथे लोक अडकल्याची परिस्थिती नाही. ररस्त्यावरील पाणी आणि अडकलेल्या छोट्या गाड्या बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.”

ते पुढे म्हणाले, “या मुद्द्यावर आज अर्धवट माहिती देण्याऐवजी, उद्या (मंगळवारी) मी सभागृहात या संपूर्ण परिस्थितीवर सविस्तर आणि अधिकृत निवेदन सादर करेन.”

युवकांना पर्यटनाला न जाण्याचे आवाहन

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केले की, अतिवृष्टीच्या काळात पत्रे उडून जाण्याचा किंवा झाडे पडण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय प्रवास टाळावा. विशेषतः तरुण वर्गाने अशा वादळी वातावरणात पर्यटन स्थळांवर जाणे टाळावे.

विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित

या गंभीर परिस्थितीवर अधिक प्रभावशाली उपाययोजना करण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघात मदतकार्यासाठी पोहोचता यावे, म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजचे कामकाज स्थगित केले. ते म्हणाले, “अतिवृष्टीची परिस्थिती ही कुणाच्या हातात नसते. अशी परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य असेल, तर ती अधिक प्रभावशालीरित्या हाताळली जाऊ शकते. त्यामुळे सभागृहातील सर्व सदस्यांनी यासंदर्भात सतर्क राहून, योग्य ते सहकार्य करून, ही परिस्थिती हाताळण्यासाठी शासनाला मदत करावी.”

हे ही वाचा…

मुंबईसह राज्यातील पावसाच्या दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करा:दोषींवर कठोर कारवाईची विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची मागणी

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक भागांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित केला. या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी सरकारकडे केली. सविस्तर वाचा…

मुंबई-गोवा महामार्गावर संकट आणखी गडद:कशेडी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली; 24 तासांपासून वाहतूक ठप्प, हजारो प्रवासी अडकले

राज्यभर मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून कोकणातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणसह अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ खवटी परिसरात दगड-मातीचा प्रचंड ढिगारा महामार्गावर कोसळल्याने दोन्ही मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी गेल्या तब्बल 24 तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प असून वाहनांच्या किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.