![]()
मुलींची शैक्षणिक प्रगती मुलांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगत व्यसनांपासून मुलांना दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी केले. येथील मुस्लिम बिरादार जमात संस्थेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार काझी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार एफ. आर. शेख, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, नाशिरभाई मुलाणी, डॉ. संदीप तांबारे, प्राचार्य डॉ. अब्दुल शेख उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष हाजी ज. इक्बालभाई पटेल यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर संघटक वाहिदपाशा शेख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी समाजातील १०८ गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेले अधिकारी, डॉक्टर आणि वकील यांचाही विशेष गौरव करण्यात आला. आभार अख्तर शेख यांनी मानले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी जाकीरहुसेन शेख, वसिम पठाण, अख्तर शेख, वाहिदपाशा शेख, ॲड. सर्फराज मुजावर आणि रफिक सातारकर, सलीम शेख, सादिक मुल्ला यांच्यासह विद्यार्थानी आदींनी परिश्रम घेतले. मुस्लिम बिरादार जमात संस्थेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या १०८ गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेले अधिकारी, डॉक्टर व वकील यांचाही विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत व्यसनांपासून दूर राहून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी केले. गुणवंतांचा केला गौरव २६ जुलै रोजी पहाटे ‘अक्कलकोट १०के भक्ती रन’चे आयोजन केले आहे. याच्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंकचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते होणार आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांच्या विद्यमाने या स्पर्धेत ३, ५ आणि १० किलोमीटर अशा विविध गटांचा समावेश आहे. सहभागींना टी-शर्ट, पदक, प्रमाणपत्र, बक्षिसे, नाश्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.
Source link
मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्याची गरज- काझी:‘मुस्लिम बिरादार जमात’ तर्फे गुणवंतांचा सत्कार