Headlines

बांधकाम कामगार हाच समाज विकासाचा कणा- आ. राजळे:शासन योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत विस्तार; शेवगाव-पाथर्डीत 19.30 कोटींच्या निधीचे वाटप‎



बांधकाम कामगार हा खऱ्या अर्थाने समाज आणि देशाच्या विकासाचा मुख्य कणा आहे. त्यांच्या कष्टाला योग्य सन्मान आणि सुरक्षा देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांसाठी आयोजित भव्य संयुक्त लाभ वितरण मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. आदिनाथनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यात हजारो कामगारांना आर्थिक साहाय्य आणि सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.

आमदार राजळे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वाखाली राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांसाठी अनेक लोकाभिमुख आणि महत्त्वाच्या कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. पूर्वी कागदावर राहणाऱ्या या योजना आता थेट तळागाळातील आणि शेवटच्या घटकातील कामगारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत. शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक विकासाच्या माध्यमातून कामगार कुटुंबांचे जीवनमान उंचावत आहे. तालुक्यातील प्रत्येक पात्र कामगाराने या मंडळाकडे आपली नोंदणी करून हक्काच्या योजनांचा लाभ घ्यावा. या मेळाव्याचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील एकूण १५,५८५ लाभार्थ्यांना १९ कोटी २९ लाख ८८ हजार ३०० रुपयांचे थेट अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले. ५,५६१ लाभार्थ्यांना ६ कोटी ३९ लाख रुपयांचे वाटप (यात ५,४३३ शैक्षणिक लाभ, ८७ सामाजिक सुरक्षा, १९ आरोग्य आणि २२ आर्थिक साहाय्याचा समावेश). १०,०२४ लाभार्थ्यांना १२ कोटी ९० लाख रुपयांचे वाटप (यात ९,७५१ शैक्षणिक लाभ, २०९ सामाजिक सुरक्षा, ३३ आरोग्य आणि २४ आर्थिक साहाय्याचा समावेश). कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेत शासनाकडून मोठ्या प्रमाणावर साहित्याचे वाटप करण्यात आले. शेवगाव आणि पाथर्डीतील तब्बल २६ हजार कामगारांना सेफ्टी शूज, हेल्मेट, जॅकेट, सोलर टॉर्च आणि मच्छरदाणी असलेला विशेष ‘सुरक्षा संच’ देण्यात आला. तसेच, दोन्ही तालुक्यातील १७ हजार कामगार कुटुंबांना स्वयंपाकघरासाठी उत्कृष्ट ‘गृहपयोगी भांड्यांचे संच’ वितरित करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ डिसले, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, सरपंच मोनाली राजळे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *