मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता भाजपने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत राऊत यांच्य
.
‘दरड कोसळली, बोगदा नाही’
बन म्हणाले की, कनेक्टिंग लिंक प्रकल्पावर झालेल्या घटनेनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर काम केले. दरड हटवून केवळ 18 तासांत मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. “एका ठिकाणी किरकोळ अडचण निर्माण झाली म्हणून संपूर्ण प्रकल्प निकृष्ट ठरत नाही. त्रुटी दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे काम सरकारने केले,” असे त्यांनी सांगितले.
कनेक्टिंग लिंकमुळे मुंबई-पुणे कनेक्ट झाले; पण तुमचा पक्षच ‘मिसिंग’
संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बन यांनी टोला लगावला. “कनेक्टिंग लिंकमुळे मुंबई आणि पुणे जोडले गेले, पण संजय राऊत आणि त्यांचा पक्षच जनतेतून ‘मिसिंग’ झाला आहे. त्याची चिंता त्यांनी आधी करावी,” असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसच ‘इन्फ्रामॅन
राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करत बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. “अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, कनेक्टिंग लिंक यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. त्यामुळे महाराष्ट्राचा ‘इन्फ्रामॅन’ कोण आहे, हे जनतेला माहिती आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळावरही निशाणा साधत, “त्या काळात एकही मोठा प्रकल्प उभा राहिला नाही. उलट मेट्रो आणि कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांना विरोध करण्यात आला,” असा आरोप केला.
कनेक्टिंग लिंकची फाईल पृथ्वीराज चव्हाण यांनी रोखली होती
बन यांनी दावा केला की, कनेक्टिंग लिंक प्रकल्पाची फाइल तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर न करता रखडवून ठेवली होती. “देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प पूर्ण झाला. त्यामुळे या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये,” असे ते म्हणाले.
“वारी आणि कुंभमेळ्याची चिंता करू नका”
संजय राऊत यांनी वारी आणि कुंभमेळ्याबाबत केलेल्या वक्तव्यांवरही बन यांनी प्रतिक्रिया दिली. “वारी आणि कुंभमेळ्याची चिंता करण्याची गरज नाही. वारकरी आणि हिंदू समाज सक्षम आहे. राज्य सरकार पूर्ण ताकदीने या आयोजनामागे उभे आहे,” असे त्यांनी सांगितले. राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर बोलताना बन म्हणाले, “राम मंदिराशी संबंधित कोणतीही गडबड झाली असेल तर त्याची चौकशी होईल. दोषींना सोडले जाणार नाही आणि पै-पै वसूल केली जाईल.”
याचवेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका करत, “ज्या काँग्रेसने प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केले, त्यांना राम मंदिराच्या नावाने आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही,” असा आरोप केला.
संबंधित बातमी वाचा…
देशात मोदी अन् फडणवीसांचे बिंग फुटले:फडणवीसांनी आम्हाला विकास शिकवू नये, त्यांनी केलेली कामे महिनाभरात कोसळतात- संजय राऊत

भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून मेट्रोपासून ते लोकल ट्रेन आणि बेस्ट बसपर्यंत सर्वच वाहने गळत आहेत. प्रत्येक कामात आधी कमिशन खाण्याच्या वृत्तीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. कालच्या एकाच पावसाने या सरकारची पोलखोल केली असून, जनतेचे तब्बल 4,500 कोटी रुपये एका झटक्यात वाहून गेले आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘विकासपुरुष’ नरेंद्र मोदी आणि ‘इन्फ्रामॅन’ देवेंद्र फडणवीस यांचे बिंगआता पूर्णपणे फुटले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. येथे वाचा संपूर्ण बातमी
‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून सरकारवर रोहित पवारांचा हल्लाबोल:’अजितदादांच्या अपघातातील कंपनीलाच कंत्राट?’, चौकशीची मागणी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल्याच्या घटनांमुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकल्पाचे कंत्राट नवयुगा आणि अॅफकॉन या कंपन्यांना देण्यात आल्याचे सांगत, “अजित पवारांच्या अपघाताशी संबंधित प्रकरणात ज्या कंपनीचे नाव समोर आले होते, त्याच्याशी संबंध असलेल्या कंपनीलाच मिसिंग लिंकचे कंत्राट देण्यात आले,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
उद्घाटनाच्या दोनच महिन्यांत फज्जा:काय आहे मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प? खड्डे आणि दरड दुर्घटनेवरून विरोधकांचे सरकारला जळजळीत प्रश्न

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पहिल्याच मुसळधार पावसात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे दोन महिने उलटत नाहीत, तोच बोगद्यांमध्ये झालेली पाण्याची गळती, मुख्य रस्त्याला गेलेले तडे आणि दरड दुर्घटना यामुळे या 7 हजार कोटींच्या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरूनच आता विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरत, हा तांत्रिक चमत्कार आहे की कंत्राटदारांना पोसणारा कमिशनखोरीचा नवा मार्ग?” असे जळजळीत प्रश्न उपस्थित करत सरकारची कोंडी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी