Headlines

Mahabaleshwar Rain 393mm; Koyna Dam 34% Filled


सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा वाढला आहे. महाराष्ट्रा भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची प्रकल्पीय क्षमता 105.25 टीएमसी असून यामध्ये 7 जुलै सकाळी 10 वाजेपर्यंत 35.71 टीएमसी

.

7 जुलै अखेर जिल्ह्यात 288.7 मि.मी. पर्जन्यमान झाले असून पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. 7 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात 22 महसूल मंडळांमध्ये 65 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. यामध्ये महाबळेश्वर महसूल मंडळामध्ये सर्वाधिक म्हणजेच 392.8 मि.मी. पाऊस झाला आहे. त्या खालोखाल लामज, बामणोली, तापोळा या महसूली मंडळांमध्ये 169 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वाठार 148.5 मि.मी., करहर आणि केळघर या दोन ठिकाणी 124.5 मि.मी., पाचगणी 136.5 मि.मी., पसरणी 110.3 मिमी., पाटण 100.5 मि.मी.,

महाबळेश्वर तालुक्यातील नावली येथील 7, धावली येथील 17 आणि रुळे येथील 8 अशा एकूण 32, जावली तालुक्यातील बहुले येथील 23 आणि बोंडारवाडी येथील 8 अशा 31, वाई तालुक्यातील जांभळी येथील 22 आणि डोईचीवाडी येथील 5 नागरिकांचे अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नातेवाईक, मंदिरे आदी सुरक्षीत ठिकाणी तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले आहे.

पाटण तालुक्यातील 39, सातारा तालुक्यातील 9, खंडाळा तालुक्यातील 2, जावली तालुक्यातील 11, वाई तालुक्यातील 13, महाबळेश्वर तालुक्यातील 9 अशा 83 घरांची पडझड झाली आहे. या घरांच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना निर्बंध

सातारा तालुक्यातील कारी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे उडाल्यामुळे तर खंडाळा तालुक्यातील मिरजे येथील प्राथमिक शाळा व स्मशानभूमीचे भिंत पडून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सखोल भागात पाण्या साचणाऱ्या, धबधब्याच्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती पुढील प्रमाणे

आजचा एकूण पाणीसाठा, कंसात प्रकल्पीय एकूण क्षमता टीएमसीमध्ये आणि आजची एकूण टक्केवारी.

  • कोयना – 35.71 टीएमसी (105.25 टीएमसी,) टक्केवारी 33.93 टक्के
  • धोम – 6.59 टीएमसी (13.5 टीएमसी,) टक्केवारी 48.81 टक्के
  • धोम-बलकवडी- 2.17 टीएमसी (4.08 टीएमसी,) टक्केवारी 53.19 टक्के
  • कण्हेर – 6.29 टीएमसी (10.10 टीएमसी,) टक्केवारी 62.28 टक्के
  • उरमोडी – 4.50 टीएमसी (9.96 टीएमसी,) टक्केवारी 45.18 टक्के
  • तारळी – 1.73 टीएमसी (5.85 टीएमसी,) टक्केवारी 29.57 टक्के.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश

पावसामुळे झाड कोसळने, दरड कोसळने, रस्ता खचणे असे प्रकार होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अशा वेळी यंत्रणांनी सजग राहून तात्काळ कार्यवाही करावी व रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत. धोकादायक ठिकाणी दरड प्रवण क्षेत्रांमध्ये नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देत तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले आहेत.

हे ही वाचा…

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट:पुढील 10 दिवस ब्रेक मिळण्याची शक्यता; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोठा सल्ला

जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढले असले, तरी आता राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ जुलैपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाची ही विश्रांती किमान पुढील १० दिवस कायम राहण्याची शक्यता असून, या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

पहिल्याच पावसात स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती:प्लॅटफॉर्मवर ठेवल्या बादल्या; महामेट्रोच्या हायटेक दाव्यांची पोलखोल

पुण्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते आणि रेल्वे वाहतुकीपाठोपाठ थेट मेट्रो सेवेलाही बसल्याचे समोर आले आहे. पुण्यातील अत्यंत वर्दळीचे आणि नुकतेच प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेले ‘स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानक’ पहिल्याच मोठ्या पावसात थेट गळू लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानकाच्या छतातून पाणी टपकत असल्याने मेट्रो प्रशासनाला चक्क प्लॅटफॉर्मवर आणि प्रवाशांच्या चालण्याच्या जागेवर प्लास्टिकच्या बादल्या आणि टब ठेवावे लागल्याने पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.